अर्ध्या एकरात हिरवी मिरचीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:25 AM2020-12-24T04:25:47+5:302020-12-24T04:25:47+5:30

स्वप्निल खाडे पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी पुंडलिक उपरे यांनी अर्ध्या एकरात आधुनिक पद्धतीने लागवड करून पहिल्या ...

Record production of green chillies in half an acre | अर्ध्या एकरात हिरवी मिरचीचे विक्रमी उत्पादन

अर्ध्या एकरात हिरवी मिरचीचे विक्रमी उत्पादन

Next

स्वप्निल खाडे

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी पुंडलिक उपरे यांनी अर्ध्या एकरात आधुनिक पद्धतीने लागवड करून पहिल्या तोडणीतच ३० क्विंटल उत्पादन मिळविले. परिसरातील अन्य शेतकºयांच्या तुलनेत हे उत्पादन जास्त असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

पुंडलिक उपरे हे शेतात दरवर्षी नवीन पद्धतीने विविध पिकांची लागवड करतात. गावाच्या नाल्यालगत त्यांना पाच एकर शेती आहे. घरातील सर्वच सदस्य शेतात राबतात. प्रत्येक सदस्याला शेतीची कामे वाटून दिली आहे. त्यामुळक आपापली जबाबदारी समजून शेतीची कामे करतात.पाच एकरात विविध प्रकारच्या पिकांची लागवड करतात. कापूस, तूर, सोयाबीन पिकांसह कारली, ढेमसे, टमाटर, वांगे भाजीपाला पिके घेतली आहे. अर्ध्या एकर शेतात आधुनिक पद्धतीने मिाची लागवड केली आहे. पहिल्या तोडणीतच ३० क्विंटल उत्पादन घेतले. शेवटच्या टप्प्यात २०० क्विंटल मिरची उत्पादन होणे अपेक्षित आहे. मिरचीला प्रारंभी ६० रूपये प्रति किलो असा दर मिळाला होता. आताही दर बरा आहे. हिंमतीने प्रबळ इच्छाशक्ती व मेहनतीच्या बळावर फुलविलेली शेती अन्य शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती करायला प्रोत्साहन देणारा आहे.

कोट

निसर्गाची अवकृपा, शासनाचे शेतकरीविरोधी धोरणामुळे दिवसेंदिवस शेतीला अवकळा येत आहे. मात्र, हताश न होता आधुनिक पद्धतीने शेतीची कास धरली तर शेतीत भरघोस उत्पादन येईल.

-पुंडलिक उपरे, शेतकरी, पळसगाव

Web Title: Record production of green chillies in half an acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.