आठ प्रतिष्ठानांकडून दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:26 AM2021-05-22T04:26:35+5:302021-05-22T04:26:35+5:30
घुग्घुस : कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने कडक लाॅकडाऊन, जिल्हाबंदी व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद केल्या.तरीही कोरोना नियमाचे ...
घुग्घुस : कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शासनाने कडक लाॅकडाऊन, जिल्हाबंदी व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद केल्या.तरीही कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या आठ प्रतिष्ठानांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून साडेअकरा हजार रुपये दंड वसूल केला.
सदर कारवाई शुक्रवारी महसूल व नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. गावात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. दररोज मृत्यू होत आहे. शासनाने राज्यात जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावले असताना बऱ्याच व्यापाऱ्यांकडून कोरोना नियमाचे उल्लंघन होत आहे. उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक महसूल विभागाचे अधिकारी व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यानी संयुक्त कारवाईची मोहीम राबवित आठ व्यापाऱ्यांकडून साडेअकरा हजार रुपये दंड वसूल केला. यानंतर कोविड नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास दुकाने सील करण्याची ताकीद दिली.सदर कारवाई मंडळ अधिकारी कैलास नवले, तलाठी दिलीप पिल्लई, नगर परिषदेचे कर्मचारी विठोबा झाडे व सूरज जंगम यांनी केली.