कोरोना काळात पोलीस व महसूल विभागाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:56+5:302021-09-02T04:59:56+5:30
शासकीय कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांकडून कुठल्याही प्रकारची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी ...
शासकीय कार्यालयात काम करताना सर्वसामान्यांकडून कुठल्याही प्रकारची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी आर्थिक हव्यासापोटी पैशाची मागणी करतात. कोरोनामुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत असताना आपले कर्तव्य प्रामाणिक बजावण्याचे सोडून कर्मचारी आर्थिक हव्यासापोटी लाच घेतात. मागील आठ महिन्यांत सहा जण लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अलगद सापडले आहेत. यामध्ये दोन पोलीस, दोन महसूल विभागाचे कर्मचारी, तसेच एक नगररचना विभाग, एका ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत ही आकडेवारी फुगत चालली आहे.
बॉक्स
पाचशे रुपयांपासून लाखोंपर्यंतची लाच
गुन्ह्याची कारवाई टाळण्यासाठी
सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशमधील मागील काही महिन्यांपूर्वी एक कर्मचाऱ्याने जुगाराची कारवाई केली. मात्र, ती कारवाई टाळण्यासाठी आरोपीकडून लाच मागितली. तो जेव्हा लाच देण्यास तयार झाला. तेव्हा त्याने आरोपीला सोडून दिले. तेव्हापासून तो कर्मचारी लाचेची मागणी करीत होता. याबाबत एसीबीकडे तक्रार करताच त्या पोलीस कर्मचाऱ्याला अलगद अटक करण्यात आली. यासोबतच अवैध वाहतुकीसंदर्भात कारवाई टाळण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली.
------
कोट
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्यालयांतील कर्मचारी जर लाचेची मागणी करीत असेल, तर त्यासंदर्भातची तक्रार ०७११२ २५१०३८२, ९४२३६८३२११ या नंबरवर किंवा एचओबीएसीबीएनबीआर ॲटदीरेट सीबीआय डॉट जिओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर करावी.
-सलीम खान, पोलीस अधीक्षक, सीबीआय, एसीबी, नागपूर
बॉक्स
लाच मागितली जात असेल, तर येथे संपर्क साधा
शासकीय किंवा खासगी कार्यालयात बहुतेकदा लाच मागितली जात असल्याचे दिसून येते. मात्र, बहुतेक जण तक्रार करायला येत नाहीत. त्यामुळे लाचखोराची हिंमत वाढत जाते. कुणीही बेकदेशीररीत्या पैशाची मागणी करीत असेल तर त्याची तक्रार करावी. कार्यालयात येणे शक्य नसल्यास तशी माहिती द्यावी, आम्ही स्वत: तपास करून कारवाई करू. तक्रारीसाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.
-अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, चंद्रपूर
------