रासायनिक खते व पेट्रोल, डिझेल दरवाढ तत्काळ कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:29 AM2021-05-19T04:29:39+5:302021-05-19T04:29:39+5:30

जाहीर झालेल्या खतांच्या किमतीमध्ये सरासरी ३० ते ४० टक्के दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात प्रचंड मोठी वाढ होणार असून, ...

Reduce the price of chemical fertilizers and petrol and diesel immediately | रासायनिक खते व पेट्रोल, डिझेल दरवाढ तत्काळ कमी करा

रासायनिक खते व पेट्रोल, डिझेल दरवाढ तत्काळ कमी करा

Next

जाहीर झालेल्या खतांच्या किमतीमध्ये सरासरी ३० ते ४० टक्के दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात प्रचंड मोठी वाढ होणार असून, शेतकऱ्यांची लूटमार होणार आहे. सर्वांत जास्त वापरले जाणारे डीएपी खताचे दर १ हजार २०० रुपयांवरून थेट १ हजार ९०० रुपये झाले आहेत. सुपर फॉस्फेटसह अन्य खतांचे दरही असेच मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ही शेतकर्‍यांची लूटमार असून, या निर्णयाचा निषेध समितीने केला आहे.

दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दरात व डिझेल पंपाद्वारे सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे डिझेल व पेट्रोलची दरवाढ तत्काळ थांबवावी, अशी मागणी समितीने केली आहे. कोरोना या महामारीच्या संकटात शेतमालाचे व भाजीपाल्याचे भाव पडले असून, ते निम्म्यावर आले आहेत, तर खताच्या किमती दीड पटीने वाढल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे. आधीच खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळत नसल्यामुळे थकलेल्या कर्जापोटी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यावर नियंत्रण आणण्याकरिता व शेती व्यवसाय वाचविण्याकरिता खत व डिझेलची दरवाढ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिष्टमंडळामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार, कार्याध्यक्ष किशोर दहेकर, विदर्भ सचिव मितीन भागवत, युवा आघाडी अध्यक्ष सुदाम राठोड, शहराध्यक्ष अनिल दिकोंडवार, कपिल ईद्दे, हिराचंद बोरकुटे, सुधीर सातपुते, अरुण नवले, गोपी मित्रा, रमेश नळे, प्रभाकर ढवस, अरुण वासलवार, प्रा. नीळकंठ गौरकार, तुकेश वानोडे, ॲड. प्रफुल्ल आस्वले, डॉ. संजय लोहे, रमाकांत मालेकर, ॲड. श्रीनिवास मुसळे यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Web Title: Reduce the price of chemical fertilizers and petrol and diesel immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.