चंद्रपूर वीज केंद्राचा पाणीपुरवठा कमी करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:11 PM2018-01-09T23:11:26+5:302018-01-09T23:11:59+5:30

उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

Reduce the water supply of the Chandrapur power station | चंद्रपूर वीज केंद्राचा पाणीपुरवठा कमी करावा

चंद्रपूर वीज केंद्राचा पाणीपुरवठा कमी करावा

Next
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : उन्हाळा सुरू होण्याआधीच शहरात भीषण पाण्याची टंचाई सुरू आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे सीएसटीपीएसला शासनाकडून होत असलेला पाणी पुरवठा कमी करून चंद्रपूर शहराला नियमित पाणी पुरवठा देण्यात यावा, तसेच आवश्यक्ता भासल्यास शासनाने वीज निर्मिती प्रकल्प बंद करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
चंद्रपूर शहराला लागून इरई धरण आहे. मात्र यावर्षी पाऊस कमी पडल्याने धरणात अत्यल्प पाणीसाठी आहे. याही स्थितीत सीएसटीपीएसला पाण्याचा पुरवठा होत आहे. सद्धास्थितीतील धरणातील पाण्याची क्षमता बघता सीएसटीपीएसला देण्यात येत असलेला पाणी पुरवठा बंद करुन शहरवासियांना जुलै महिन्यापर्यंत नियमित पाणी पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करावे.
चंद्रपुरात भीषण पाणीटंचाईचे सावट दिसताना सीएसटीपीएसला वीज निर्मिती करण्याकरिता शासनाकडून पाणी देण्यात येत आहे. सदर वीज निर्मितीचा शहरातील जनतेला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. उलट वीजनिर्मिती केंद्रामुळे येथील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे दहा वर्षाने आयुमर्यादा कमी होत आहे. त्यामुळे शासनाने सीएसटीपीएसला होत असलेला पाणी पुरवठा कमी करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी नगरसेवक विशाल निंबाळकर, इरफान शेख, विनोद अनंतवार, अशोक खडके, लोकेश कोटरंगे यांची उपस्थिती होती.

Web Title: Reduce the water supply of the Chandrapur power station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.