रेतीअभावी वेकोलिच्या भूमिगत खाणीतील उत्पन्नात घट
By admin | Published: May 11, 2014 12:14 AM2014-05-11T00:14:31+5:302014-05-11T00:14:31+5:30
माजरी भूमिगत कोळसा खदानीत कोळसा खाढल्यानंतर त्या जागी भरण्याकरिता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरू शकत नसल्याने भूमिगत कोळसा खदानीतील
ंवरोरा : माजरी भूमिगत कोळसा खदानीत कोळसा खाढल्यानंतर त्या जागी भरण्याकरिता रेती मिळणे बंद झाले आहे. रेती भरू शकत नसल्याने भूमिगत कोळसा खदानीतील प्रति दिवस ११०० टन उत्पादन देणार्या खदानीला मागील पाच महिन्यांपासून प्रतिदिन ३०० टन कोळसा उत्पादन होत आहे. त्यामुळे स्थायी कामगारांमध्ये असुरक्षिततचे वातावरण पसरले असून रेतीअभावी भूमिगत कोळसा खदानीत आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भूमिगत कोळसा खदानीत कोळसा काढल्यानंतर पाणीमिश्रीत रेती भरण्यात येते. त्यानंतर पुढील कोळसा काढला जातो. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता कमी असल्याने भूमिगत कोळसा खदानीत कामगारही सुरक्षीत राहते. रेतीचा भरणा केला. नाही तर मोठा अपघातही होण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्याच्या दिवसात रेती अभावी आग लागण्याची मोठी शक्यता असते. भूमिगत कोळसा खदानीत उत्पादनाच्या १.८ टक्के रेतीचा भरणा करणे आवश्यक असते. भूमिगत कोळसा खदानीत १०३९ स्थायी कामगार कार्यरत आहे. मागील दोन वर्षांपासून पाच हेक्टर आराजी असलेल्या घाटातील रेती काढण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागते. वेकोलिच्या वतीने पर्यावरण विभागाकडे रेतीच्या मंजुरीकरिता प्रकरण पाठविण्यात आले आहे. याकरिता पर्यावरण विभागाची एक चमू येऊन निरीक्षण करून गेली परंतू अद्यापही मंजुरी मिळाली नाही. सध्या कोळसा काढलेल्या ठिकाणी मिश्रीत माती भरण्यात येत आहे. ११०० टन प्रति दिन उत्पादन करणार्या या भूमिगत खदानीचे उत्पादन सध्या दिवसाकाठी ३०० टनावर घसरले आहे. उन्हाळ्यामध्ये रेती अभावी खदानीत आग लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट आल्याने कामगारांमध्ये भिती व्यक्त केल्या जात आहे. उत्पादनात घट आल्याने कामगारांचे स्थानांतरण इतरत्र केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातील अनेक कामगार वणी, वरोरा, माजरी परिसरात स्थायी झाले आहे. त्यांचे स्थानांतरण झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनाही झळ सोसावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. रेतीकरिता १ कोटी ६० लाख शासनास देणे आहे. त्यातील ४४ लाखाचा भरणा केला. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. उत्पादनात घट झाल्याने कामगारांना अतिरिक्त सुविधा देता येत नाही. एक महिन्यात रेती मिळणे आवश्यक आहे. मागील काही महिन्यापासून रेती मिळत नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने नाव प्रकाशीत न करण्याच्या अटीवर दिली. (तालुका प्रतिनिधी)