वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:35 PM2017-09-13T23:35:34+5:302017-09-13T23:37:06+5:30

रुग्णालयातील कारभारामुळे रुग्ण त्रस्त झाले आहे. त्यामुळे लोकमतने ९ सप्टेंबरपासून रुग्णालयातील असुविधांबाबत वृत्तमालिका चालवून शासनाचे लक्ष वेधले.

Regarding the District Magistrates to the Medical Officer | वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांची तंबी

वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांची तंबी

Next
ठळक मुद्देरूग्णालयाचा आढवा : प्रत्येक ठिकाणी यंत्रणा सक्षम ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रुग्णालयातील कारभारामुळे रुग्ण त्रस्त झाले आहे. त्यामुळे लोकमतने ९ सप्टेंबरपासून रुग्णालयातील असुविधांबाबत वृत्तमालिका चालवून शासनाचे लक्ष वेधले. या वृत्तमालिकेमुळे जिल्हाभरातील आरोग्य विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकमतच्या बातम्यांवरून काँग्रेसनेही आवाज उठविला. आता जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनीही याची गंभीर दखल घेतली असून बुधवारी आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकाºयांना आपल्या कक्षात बोलावून रुग्णालयातील कारभाराचा आढावा घेतला. गोरगरिब रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटीबध्द असून या यंत्रणेवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार आहे, असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर येथील सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यवस्थापनाचे सूत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेले आहे. त्यामुळे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. एम. जे. खान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. श्रीरामे, डॉ. प्रिती प्रियदर्शनी, डॉ. बेंबे आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाºयांनी सामान्य रुग्णालयातील प्रसुती विभागातील कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी गेल्या पाच वर्षातील प्रसूती व नवजात बालकांच्या मृत्यूबाबतची आकडेवारी जाणून घेतली. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यापासून गडचिरोली, यवतमाळ जिल्हयातून मोठया प्रमाणात रुग्ण येत आहे. त्यामुळे प्रसुतीपूर्व व प्रसुतीनंतर घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य यंत्रणेने प्रत्येक टप्प्यावर अ‍ॅलर्ट असावे, अशी तंबी जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिली. जिल्हा शल्य चिकित्सकांनीही आपल्या स्तरावरील यंत्रणा बळकट करण्याबाबतचे निर्देश वेळोवेळी संबंधितांना द्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दिल्या.
बालमृत्यूबाबत बोलताना बालरोग तज्ज्ञ डॉ. एम. जे. खान यांनी या ठिकाणी मोठया संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने बालमृत्यूची आकडेवारी अधिक वाटत असल्याचे जिल्हाधिकाºयांसमोर स्पष्ट केले. जिल्हयातील दुर्गम भागातील रुग्णांना येथे पोहचेपर्यंत उशीर होतो. त्यामुळे प्रसुती संदर्भातील रुग्णांची अधिक काळजी स्थानिक पातळीवरच घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकाºयांना सांगून आपल्या कोर्टातील चेंडू इतरत्र ढकलला. यावेळी बालमृत्यू कशामुळे होत आहे. त्याची कारणे कोणती आहेत, याची चर्चाही जिल्हाधिकाºयांनी केली.

सामान्य रुग्णालयात बेडवरच महिलेची प्रसुती
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सातत्याने बालमृत्यू होत असताना व्यवस्थापन किती गंभीर आहे. याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा आला. वेळीच उपचार न मिळाल्याने एका महिलेने चक्क बेडवरच आपल्या बाळाला जन्म दिल्याची घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत माहिती घेतली असता असे प्र्रकार येथे नवीन नसल्याचे सूत्राने सांगितले. मंगळवारी एक महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात भरती झाली. ती वॉर्ड क्र.९ मधील बेड क्र. ३ येथे होती. महिलेला आज प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतरही तिची दखल कुणीही घेतली नाही. अखेर त्या महिलेने त्याच बेडवर एका बाळाला जन्म दिल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाल्याचेही सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Regarding the District Magistrates to the Medical Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.