चंद्रपुरात मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्र स्थापन होणार; 'या' जिल्ह्यांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 01:34 PM2022-10-14T13:34:05+5:302022-10-14T13:34:39+5:30

सुधीर मुनगंटीवार आग्रही

Regional Fisheries Research Center will be established in Chandrapur - Sudhir Mungantiwar | चंद्रपुरात मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्र स्थापन होणार; 'या' जिल्ह्यांना मिळणार लाभ

चंद्रपुरात मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्र स्थापन होणार; 'या' जिल्ह्यांना मिळणार लाभ

googlenewsNext

चंद्रपूर : पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांत तळ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे येथे मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना आग्रही सूचना दिल्या, हे संशोधन केंद्र झाल्यास चारही जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे.

विदर्भातील अप्रयुक्त गोड्या पाण्याचे स्रोत लक्षात घेऊन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू डॉ. पातुरकर यांनी गुरुवारी नागपुरात मंत्री मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीत मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत चर्चा झाली. त्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेशवॉटर एक्वाकल्चर आणि एमएएफएसयूच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना करण्याबाबत ना. मुनगंटीवार यांनी सूचना दिल्या.

या केंद्राची स्थापना झाल्यास चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांतील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय व मत्स्य संवर्धनास चालना मिळेल. केंद्राच्या स्थापनेमुळे सखोल अभ्यास व संशोधन झाल्याने केंद्राची उद्दिष्ट्ये साध्य होणार आहेत. व्यवसाय व उद्योगांना चालना देण्याचा महाराष्ट्र सरकारचा हा एक प्रयत्न आहे. कुलगुरू पातुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन केंद्र सुरू झाल्यावर त्याचे अनेक फायदे मच्छीमार बांधवांना होणार आहेत. त्यांचा व्यवसाय अधिक वृद्धिगंत होईल आणि आपल्या परिसरात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे.

मत्स्य संशोधन केंद्रामुळे काय लाभ होणार?

मत्स्य प्रादेशिक संशोधन केंद्राची स्थापना झाल्यास गोड्या पाण्यातील मत्स्यबीजाद्वारे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, मायनर कार्प्सचे संगोपन आणि संवर्धनाद्वारे मत्स्यशेतीचे विविधीकरण, गोड्या पाण्यातील कोळंबी संस्कृती, एकात्मिक मत्स्यपालन प्रणाली, ब्रूडबँकचा विकास, मच्छीमार महिला, बचतगट, अल्पभूधारक शेतकरी, सहकारी संस्था सदस्य इत्यादींचे सक्षमीकरण होणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Web Title: Regional Fisheries Research Center will be established in Chandrapur - Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.