नोंदणी संकेतस्थळ बंद, ११वीची प्रवेश प्रक्रिया थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:35+5:302021-07-27T04:29:35+5:30

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करताना एसएससी बोर्डाचा सर्व्हर क्रॅश झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल समजायला चार ते आठ तास ...

Registration website closed, 11th admission process cooled down | नोंदणी संकेतस्थळ बंद, ११वीची प्रवेश प्रक्रिया थंडावली

नोंदणी संकेतस्थळ बंद, ११वीची प्रवेश प्रक्रिया थंडावली

googlenewsNext

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करताना एसएससी बोर्डाचा सर्व्हर क्रॅश झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल समजायला चार ते आठ तास विलंब झाला. त्यावेळी विद्यार्थी व पालकांच्या आनंदावर विरजण पडले. आता अकरावी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेच्या नावनोंदणीसाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ आठवडाभरापासून बंद आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले तरी मंडळाचा गलथानपणाच कारणीभूत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन गुणांचा सर्व्हरही ठप्प झाल्याने निकालाला विलंब होण्याची भीती निर्माण झाली आहे.

बॉक्स

मराठी व हिंदी भाषेची गळचेपी

सीईटी परीक्षेसाठी निश्चित केलेल्या विषयांमध्ये इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान व विज्ञान हे विषय आहेत. परंतु महाराष्ट्रात मराठी व हिंदी भाषा विषयांचा समावेश नाही. यामुळे मायबोली मराठीची व राष्ट्रभाषा हिंदीची गळचेपी होणार आहे. शिवाय या माध्यमांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. सीईटी परीक्षेत इंग्रजीसोबत मराठी व हिंदी भाषांचा वैकल्पिक भाषा विषय म्हणून तातडीने समावेश करावा, अशीही मागणी पालकांकडून केली जात आहे.

बॉक्स

मुदतवाढ न दिल्यास आंदोलन

बोर्डाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. यावर गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने तांत्रिक बाबींची तातडीने पूर्तता करावी, संकेतस्थळ विद्यार्थ्यांना विनासायास उपलब्ध करून द्यावे. नोंदणीची मुदत वाढवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी दिला आहे.

Web Title: Registration website closed, 11th admission process cooled down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.