बनावट कागदपत्राद्वारे रजिस्ट्री

By admin | Published: July 19, 2014 11:49 PM2014-07-19T23:49:38+5:302014-07-19T23:49:38+5:30

राजुरा शहरातील सर्व्हे क्र. १४९, २१ या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्री केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संभा कोवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Registry via fake documents | बनावट कागदपत्राद्वारे रजिस्ट्री

बनावट कागदपत्राद्वारे रजिस्ट्री

Next

जमीन विक्री प्रकरण : आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
राजुरा : राजुरा शहरातील सर्व्हे क्र. १४९, २१ या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून रजिस्ट्री केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संभा कोवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपरोक्त सर्व्हेमध्ये चंद्रप्रकाश मेश्राम आणि शकुंतला मेश्राम यांची ०.६६ आर जमीन असून या दोघांच्याही बनावट स्वाक्षऱ्या करून राजुरा येथील रजिस्ट्री कार्यालयात खोटी रजिस्ट्री संभा कोवे यांनी केली. या प्रकरणात फिर्यादी चंद्रप्रकाश मेश्राम यांनी पोलिसात तक्रार केल्यामुळे संभा कोवे याच्याविरूद्ध भादंवि ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच राजुरा, चुनाळा, बामनवाडा येथेही अनेक आदिवासींची फसवणूक झाल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, याबाबत आयपीएस अधिकारी सुहेल शर्मा यांच्या कार्यकाळातच तक्रार करण्यात आली होती. परंतु हे प्रकरण थंडबस्त्यात होत्या. त्यानंतर पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. वरकरणी या प्रकरणात संभा कोवे हे गुंतल्याचे दिसत असले तरी यामागे बड्या लोकांचेही हात गुंतल्याची शक्यता आहे.
खोटी रजिस्ट्री करून देणारे उपनिबंधक, एनएची परवानगी देणारे उपविभागीय अधिकारी हेसुद्धा या प्रकरणात दोषी असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. एकूणच या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Registry via fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.