गंजवार्डात नियमित स्वच्छता करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:27 AM2021-04-15T04:27:35+5:302021-04-15T04:27:35+5:30
सिमेंट रस्त्याचे काम त्वरित करावे चंद्रपूर : येथील गंजवार्डामध्ये रस्त्याचे सिमेंटीकरण सुरु आहे. मात्र काम अतिशय संथगतीने सुरु असल्यामुळे ...
सिमेंट रस्त्याचे काम त्वरित करावे
चंद्रपूर : येथील गंजवार्डामध्ये रस्त्याचे सिमेंटीकरण सुरु आहे. मात्र काम अतिशय संथगतीने सुरु असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेरोजगारांमध्ये संभ्रम वाढला
चंद्रपूर :मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावर्षीही पुन्हा संचारबंदी सुरु आहे. परिणामी बेरोजगारांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एक तर रिक्त जागा भरल्या जात नाही. त्यातच वय वाढत असल्यामुळे नोकरीची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
शहरात स्वच्छता मोहीम राबवावी
चंद्रपूर : शहरातील बाबूपेठ, हिन्दूस्तान लालपेठ काॅलनी, महाकाली वार्ड आदी भागात नियमित स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वाहनतळाअभावी वाहनधारकांना त्रास
चंद्रपूर : शहरातील काही भागामध्ये वाहनतळ नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने शहरात वाहनतळ निर्माण करावे, अशी मागणी केली जात आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवाव्या
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्त आहे. मात्र यातील काहींना नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विविध कंपनीने प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : पडोली परिसरातमध्ये काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. विशेषत: पडोली चौकामध्ये काही व्यावसायिकांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले आहे. बा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाहनधारकांवर कारवाई करावी
चंद्रपूर : येथील नागपूर रोड, बल्लारपूर रोड, तुकूम, दुर्गापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्तळ असते. नियमानुसार वाहन न चालविता वाट्टेत तसे वाहन पळविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. एवढेच नााही तर रस्त्याच्या वळणावर वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यावर पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी केली जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांवर ताण वाढला
चंद्रपूर : कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचे पालन करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासनावर जबाबदारी आहे. त्यामुळे सध्यास्थितीत पोलीस तसेच जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे.
सुविधा पुरविण्याची मागणी
चंद्रपूर : ग्रामीण तसेच शहरी भागातील काही अंगणवाडी केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या लाॅकडाऊनची स्थिती असल्यामुळे या अंगणवाडी भरत नसल्या तरी कोरोनाचे संकट गेल्यानंतर अंगणाडी भरणार आहे. त्यामुळे सुविधा पुरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील मिलन चौक, वडगाव, ट्रायस्टार होटल आदी चौकांतील वाहतूक दिवे बंद असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक शाखेने लक्ष देवून सिग्नल सुरु करावे, अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, शहरात वाहनांची संख्या वाढली असताना रस्ते मात्र जैसे थे आहे.
प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : वाहनांची संख्या वाढली आहे. त्यातच कर्णकर्कश हॉर्न लावण्यासाठी आणि भररस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी आहे; मात्र पाहिजे तशी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे मागील काही दिवसामध्ये शहरात प्रदूषणाच्या समस्येमध्ये वाढ झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे
चंद्रपूर : अल्पवयीन वाहन चालक मोठ्या प्रमाणात वाहन चालवित आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे वाहतूक विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, काही पालक आपल्या पाल्यांकडे वाहन देवून मोकळे होत आहे. मात्र अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.