राजुऱ्याला दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची सेवा नियमित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:08+5:302021-08-20T04:32:08+5:30

त्यामुळे नियमित सेवा देणारा अधिकारी द्यावा, अशी मागणी जनतेनी केली आहे. तालुक्याला औद्योगिक वलय असल्याने शहरात अधिकाऱ्यांसह मजूरवर्ग ...

Regularly give the service of Deputy Registrar to Rajura | राजुऱ्याला दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची सेवा नियमित द्या

राजुऱ्याला दुय्यम निबंधक अधिकाऱ्याची सेवा नियमित द्या

Next

त्यामुळे नियमित सेवा देणारा अधिकारी द्यावा, अशी मागणी जनतेनी केली आहे. तालुक्याला औद्योगिक वलय असल्याने शहरात अधिकाऱ्यांसह मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. तसेच शहरालगतच्या चुनाळा व रामपूर परिसरात ले आऊटचा बाजार भरला आहे. त्यामुळे प्लॉटचे खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. सोबतच सध्या शेत जमिनीच्या व्यवहारात कमालीची वाढ झाली आहे. या जमिनीच्या रजिस्ट्रीकरिता शेतकऱ्यांना मुख्यालयी यावे लागत आहे. परंतु दुय्यम निबंधक अधिकारी हा दोनच दिवस सेवा देत असल्याने जनतेची मोठी गैरसोय होत आहे. नियमित अधिकारी नसल्याने जनतेला आल्या पावली परत जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुय्यम निबंधक अधिकारी हा नियमित देऊन जनतेची परवड थांबवावी, अशी मागणी जनतेनी केली आहे.

Web Title: Regularly give the service of Deputy Registrar to Rajura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.