पहिले मोबदला देऊन पुनर्वसन करा, नंतरच घर खाली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:32 AM2021-09-15T04:32:50+5:302021-09-15T04:32:50+5:30
वेकोलि मुख्यमहाप्रबंधकांनी वरोराचे रेल्वे अभियंता यांच्या स्वाक्षरीने आंबेडकर वार्ड, बाजार लाईन, एलसीएच रेल्वेलगतच्या १४० जणांना घरे खाली करण्याची ...
वेकोलि मुख्यमहाप्रबंधकांनी वरोराचे रेल्वे अभियंता यांच्या स्वाक्षरीने आंबेडकर वार्ड, बाजार लाईन, एलसीएच रेल्वेलगतच्या १४० जणांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. वेकोलि माजरी एकतानगर येथे २२ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ६२ कुटुंबीयांना घरे खाली करण्याची नोटीस बजावली. पंधरा दिवसांत घर खाली करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, पीडित कुटुंबांनी माजरी-पाटाळाचे जि. प. सदस्य प्रवीण सुर यांच्याकडे धाव घेतली. सुर यांनी प्रकरण गंभीर असल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, आमदार मुनगंटीवार यांनी तत्काळ दखल घेऊन चंद्रपूर येथे शासकीय विश्रामगृहात वेकोलि अधिकारी व अन्यायग्रस्त नागरिकांची बैठक बोलावली. या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी काही जमीन सरकारी, काही वेकोलिची, तर काही रेल्वेची आहे. नागरिक गेल्या पन्नास ते साठ वर्षांपासून याठिकाणी राहत आहे. त्यांना हटवायचेच असेल तर यांना योग्य मोबदला द्या व त्यांचे पुनर्वसन करा, असे वेकोली अधिकाऱ्यांना बजावले. कोणालाही बेघर करता येणार नाही, असे वेकोलिच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगितले. बैठकीत वेकोलि माजरीचे मुख्यमहाप्रबंधक वि. के. गुप्ता, क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक राजेश नायर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सूर, माजी जि. प. सदस्य विजय वानखेडे, माजरी ग्रामपंचायत सरपंच छाया जंगम, ग्रामपंचायत सदस्य रवी भोगे, ज्या २०२ घरांना नोटीस मिळाले असे अन्यायग्रस्त नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
140921\img-20210914-wa0060.jpg
पुनर्वसन करण्याचे प्रयत्न करू; आ. सुधीर मुनगंटीवाराचे एकतानगर वासीयांना धीर