रणमोचन गावाचे पुनर्वसन करा : गावकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:43+5:302021-06-22T04:19:43+5:30
तालुक्यातील रणमोचन हे गाव वैनगंगा नदीच्या तिरावर ब्रह्मपुरी -आरमोरी मार्गालगत आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे नदीला पाणी वाढते. दरवर्षी गाव ...
तालुक्यातील रणमोचन हे गाव वैनगंगा नदीच्या तिरावर ब्रह्मपुरी -आरमोरी मार्गालगत आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे नदीला पाणी वाढते. दरवर्षी गाव पाण्याखाली येते. तसेच शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. गेल्यावर्षी २९ ऑगस्ट २०२० रोजी गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला महापूर आला. त्यात रणमोचन गावातील अनेक घरे व शेत पिके वाहून गेली. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाले. खाण्या- पिण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. बऱ्याच लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रणमोचन गावाचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे. याकरिता मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर, जि. प. सदस्य प्रा. डाॅ. राजेश कांबळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, संजय निराधार योजनेचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, सरपंच नीलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे, गोवर्धन दोनाडकर, अधिकराव पिलारे, श्रावण तोंडरे, किशोर पिलारे, विठ्ठल सहारे, सदाशिव मेश्राम व अन्य गावकरी उपस्थित होते.
===Photopath===
210621\img-20210621-wa0047.jpg
===Caption===
पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले