आश्रमशाळा हस्तांतरणासाठी साकडे
By admin | Published: June 13, 2017 12:32 AM2017-06-13T00:32:57+5:302017-06-13T00:32:57+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५८ ला अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आश्रमशाळेची स्थापना केली.
राष्ट्रसंतांची आश्रमशाळा : गुरुदेवभक्तांचे पालकमंत्र्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५८ ला अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आश्रमशाळेची स्थापना केली. परंतु सदर आश्रमशाळा २५ जून २००३ ला माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या भगवंतराव मेमोरीयल शिक्षण संस्थेला हस्तांतरित करण्यात आली. यामुळे राष्ट्रसंतांच्या मूळ हेतुला ठेच पोहोचली असून आश्रमशाळा परत गुरुदेव भक्तांकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी गुरुदेवभक्तांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
अखिल भारतीय गुरुकुंज आश्रम मोझरी जि. अमरावती यांच्या मार्फतीने सदर शाळेचे हस्तांतरण करण्यात आले. सन १९५८ ची परिस्थिती पाहून महाराजांनी आदिवासीसाठी निवासी आश्रमशाळा सुरु केली होती. आदिवासी बांधवांच्या पाल्यांना विनामुल्य आणि परिस्थितीनुरुप शिक्षण मिळावे, हा उदात्त हेतू ठेवून व त्या भागाच्या शैक्षणिक विकासाकरिता राष्ट्रसंतांनी शैक्षणिक संस्था सुरु केली.
परंतु काही स्वार्थी व्यक्तीनी ती शाळा विकून राष्ट्रसंतांच्या भावनांचे अवमुल्यन केले. एका अर्थाने महाराजांच्या हेतूला ठेच पोहचली आहे. त्यानुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील गुरुदेवभक्त व गुरुदेवप्रेमीच्या भावना दुखावल्या.
सदर आश्रमशाळा धर्मरावबाबा आत्राम हे परत करण्यास तयार आहेत. याकरिता शासकीय स्तरावरुन या समस्येचा निपटारा व्हावा, ही अपेक्षा बाळगून सर्व गुरुदेवप्रेमी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, गुरुदेव सेवा मंडळ तुकूमचे अध्यक्ष नत्थू बावणे यांच्या नेतृत्वात ना. मुनगंटीवार यांची भेट घेवून निवेदन दिले.
यावेळी देवराव बोबडे, नामदेव लांजेकर, अवघडे, वसंतराव धंदरे, बबनराव मत्ते, सुरेश बेलखेडे, आनंद मांदाडे, वनकर, रासेकर, रामराव धारणे, कृष्णराव नन्नावरे, विठ्ठल गौरकार, तुळशिराम बरडे, कुंदाजेवार, अलमुलवार, पुरुषोत्तम राऊत, पारखी, गुलाब राऊत, नानाजी नन्नावरे, किशोर गराटे, विश्वनाथ राजनहिरे, देहारकर, माया बोबडे, माया मांदाडे, धारणे, जीवतोडे, बावणे, खेडेकर, भोकरे, निखार, विरुटकर, जोगी, श्रीरामोजवार, राऊत, पिदुरकर, आमडे आदीसह गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.