जलसंधारणासाठी पुनर्भरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 10:38 PM2019-07-08T22:38:14+5:302019-07-08T22:38:32+5:30

सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला.

Rehabilitation requirement for water conservation | जलसंधारणासाठी पुनर्भरणाची गरज

जलसंधारणासाठी पुनर्भरणाची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सन २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागांमार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदेचे व्यवस्थापन हा यामध्ये मुख्य घटक आहे. जिल्ह्यात आजही काही गावांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन कायमची उपाय योजना करावी, प्रशासनान पुनर्भरणाच्या कामांकडे लक्ष द्यावे, असा सल्ला जलतज्ज्ञांनी दिला. मृदा व जलसंधारण विभाग, चंद्र्रपूर व मृदा व जलसंधारण संस्था वाल्मी औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने रेंजर कॉलेज येथे जलयुक्त शिवार योजनेतंर्गत कामांचे हस्तांतरण व लोकसहभागाने जलसंधारणाच्या कामाची देखभाल तसेच दुरुस्ती या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. यावेळी मृदा व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेश बावनगडे, वन प्रशिक्षण अकादमीच्या उपसंचालिका मनीषा भिंगे, मृदा व जलसंधारण संस्थेतील सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र पुराणिक, प्रा. किशोर राठोड, प्रा. मोहन नारखेडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अशोक बोकाडे, कार्यकारी अभियंता श्याम काळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक विजयता सोळंकी, जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. पिपरे उपस्थित होते. जलसंधारणाच्या तांत्रिक बाबी या विषयावर सोळंकी व डॉ. राजेंद्र्र पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. पाण्याची खालावलेली पातळी दूर करण्यासाठी पुनर्भरणाच्या कामाची गरज मांडली. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावाच्या पाण्याचा ताळेबंद तयार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने पाण्याचे जलसंधारण करावे, यावर चर्चा झाली. सुयोग्य पीक नियोजन व पाणी व्यवस्थापन या विषयावर किशोर राठोड यांनी मार्गदर्शन केले भूमिका बजावणारे पुरुषोतम मत्ते व ईश्वर ठेगणे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Rehabilitation requirement for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.