सासू-सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असावे!

By Admin | Published: March 9, 2017 12:51 AM2017-03-09T00:51:18+5:302017-03-09T00:51:18+5:30

सासु सुनेचे नाते हे काळानुरुप अधिक प्रगल्प होत चालले आहे. सासु व सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असले, तर कुटुंब आनंदी असते.

Relationship between mother-in-law should be friendly! | सासू-सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असावे!

सासू-सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असावे!

googlenewsNext

राजर्षी मार्कंडेवार : महिलांचा सन्मान सोहळा
चंद्रपूर : सासु सुनेचे नाते हे काळानुरुप अधिक प्रगल्प होत चालले आहे. सासु व सुनेचे नाते मैत्रीपूर्ण असले, तर कुटुंब आनंदी असते. त्यामुळे सासू व सुनेनी आपले नाते मित्रत्वाचे ठेवावे, असे प्रतिपादन जेसीआय गरीमाच्या अध्यक्ष राजर्षी मार्कंडेवार यांनी केले.
जेसीआय गरीमातर्फे स्थानिक हॉटेलमध्ये महिलांचा सन्मान कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन त्या बोलत होत्या.
यावेळी जेसीआय गरिमातर्फे विविध क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कामगीरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. तर महिलांसाठी मनोरंजनात्मक स्पर्धा व सासु- सुन स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी अनेक सासु-सुनांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जसीआय गरीमाच्या अध्यक्ष प्रा.डॉ. राजर्षी मार्कडेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कविता उमाटे, प्रकल्प निर्देशक डॉ.ऋतुजा मुंदडा, मोनिका जैन, डॉ. मृदुल, डॉ.अपर्णा देवईकर, सुनिता बल्की आदी उपस्थित होते.
यावेळी विद्या बांगडे, निलीमा धांडे, गायत्री वाड्यलकर, सिमा मामीडवार, तपस्या सराफ यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर आपल्या सुनेला किडणी दान करणाऱ्या सासु सुनिता बल्की यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सासु सुन जोडी या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिखा आणि अंजू गोयल, द्वितीय क्रमांक सारिका आणि कुष्णा गोयल, तृतीय क्रमांक सौम्या आणि किरण दिक्षीत यांनी पटकवला.
तर उत्तेजनार्थ पारितोषिक ममता आणि खुशबु भट्टड यांनी पटकावीले. तर मनोरंजनात्मक स्पर्धेत प्रथक क्रमांक शिखा आणि अंजू गोयल, द्वितीय राजश्री आणि ममता बैद, तृतीय क्रमांक प्रियंका व शिला बागला यांनी पकटाविले. विजेत्यांना लोहिया डिझायनर स्टुडीओचे संचालक प्रमिला व शितल लोहिया यांच्या वतिने रोख पारितोषिकचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक जेसीआय गरीमाच्या अध्यक्ष डॉ. राजर्षी मार्कडेवार, संचालन आगाथा जोसेफ, शिल्पा गुप्ता, सोनक कपूर तर आभार अश्र्विनी मुत्तावार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतसाठी रोशनी पुगलिया, निलम डावर, ज्योती रघाताटे, किर्ती मंचमवार, ज्योती कहाळे, शितल पडगेलवार, निधी टंडन, निता कोठारी, एकाता लोढा, आरती चांडक, प्रिती जानी व चंद्रपूर जेसीआय गरीमाच्या सर्व सदस्यांंनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Relationship between mother-in-law should be friendly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.