रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या नियमांमध्ये शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:17+5:302021-08-26T04:30:17+5:30

रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त राजेश मोहिते, ...

Relaxation in the rules of rainwater harvesting | रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या नियमांमध्ये शिथिलता

रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या नियमांमध्ये शिथिलता

Next

रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, नगररचनाकार आशिष मोरे उपस्थित होते.

निवासी / वाणिज्य / औद्योगिक व इतर वापराच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्यास / नसल्यास त्यांनी छतावरचे संपूर्ण पाणी पाईपद्वारे पर्याप्त आकारमानाचा शोष खड्डा करुन सोडल्यास त्यास रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून प्रमाणीत करावे, अशा सूचना आयुक्त राजेश मोहिते यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्यास त्यांनी छतावरचे संपूर्ण पाणी फिल्टर मीडियाचा वापर करुन पाईपाद्वारे विहिरीत किंवा बोअरवेलमध्ये सोडल्यास त्यास रेन हार्वेस्टिंग म्हणून प्रमाणित करण्यात येणार आहे.

जागा उपलब्ध नसल्यास दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त मालमत्ताधारकांनी पर्याप्त आकारमानाचा शोष खड्डा करुन त्यात पावसाचे पाणी मुरविल्यास किंवा सहायक आयुक्त यांच्या सहमतीने मनपा मालकीच्या मोकळ्या जागी पर्याप्त आकारमानाचे शोष खड्डा करुन किंवा मनपा मालकीच्या विहिरीत / पावसाचे पाणी मुरविल्यास त्यास रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणून प्रमाणित करण्यात येणार आहे.

Web Title: Relaxation in the rules of rainwater harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.