गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:11 AM2018-05-04T00:11:29+5:302018-05-04T00:11:29+5:30

तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे.

Release the water of Gosekhurd into the Wainganga river | गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडा

गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडा

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी : प्रभावित पाणी पुरवठा पुनरुज्जीवित होण्याची शक्यता

राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीचे पात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे कोरडे पडले आहे. त्यामुळे ३१ गावांकरिता असलेली जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली आहे. पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडल्यास अनेक गावांतील पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनानेही हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत तालुक्यातील ३१ गावांना पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा नदीत पाण्याचा साठा कायम राहू शकला नाही. वैनगंगा नदीतील पाण्यावर मूल शहरासोबत तालुक्यातच तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. दरवर्षी ग्रामस्थांना लाखो लिटर पाणी देणारी वैनगंगा नदी आता स्वत: पाण्यासाठी टाहो फोडताना दिसत आहे. तिच्या पात्रातच पाणी नसल्याने तीच असहाय्य असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत लाखो रुपये खर्चुन १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ व पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १५ वर्षांपूर्वी कार्यान्वित करण्यात आली. मूल शहराबरोबरच ३१ गावांना पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे आहे. ऐन मे महिन्याच्या तप्त उन्हात पाण्याची नितांत आवश्यकता असताना वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी नाही. त्यामुळे गावागावांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. यासोबतच सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळील वैनगंगा नदीवर लाखो रुपये खर्च करून बंधारा बांधण्याचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या आतील वैनगंगेचे पात्र पूर्णता कोरडे पडल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत १९ गावांकरिता असलेल्या बोरचांदली येथील योजनेची पाईप लाईन १५ वर्ष जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज झाली आहे. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराला प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. दुुर्लक्षितपणामुळे ऐन टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी व्यर्थ जात आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ७२ (७२) गावांना पाणीपुरवठा केला जातो. सदर योजना वैनगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदीचे पात्र कोरडे पडले आहे. गोसेखुर्दचे पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याविषयी प्रशासनाने प्रयत्न केल्यास ७२ गाव व स्वतंत्र्य ग्रामीण पुरवठा योजनेच्या शेकडो गावातील पाणी पुरवठा पुनर्जीवित होऊन पाणी समस्या सुटण्यास मदत होईल.
-जी. एम. बरसागडे, उपविभागीय अभियंता, सिंदेवाही उपविभाग जि.प. चंद्रपूर

Web Title: Release the water of Gosekhurd into the Wainganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.