घुग्घुस मच्छी मार्केटमधील अतिक्रमण हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:55 AM2020-12-11T04:55:27+5:302020-12-11T04:55:27+5:30
भोई समाज बांधवांचे ग्रामविकास अधिकाऱ्यांना साकडे फोटो : घुग्घुस : येथील आठवडी बाजार परिसरात ग्रामपंचायतीने ओटे बांधून दिले आहे. ...
भोई समाज बांधवांचे ग्रामविकास अधिकाऱ्यांना साकडे
फोटो :
घुग्घुस : येथील आठवडी बाजार परिसरात ग्रामपंचायतीने ओटे बांधून दिले आहे. या ओट्यांवर चिकन, मच्छी विक्रेत्यांना जागा नेमून दिली आहे. मात्र काही दिवसांपासून काही चिकन व्यवसायिक मच्छी मार्केटमध्ये चिकणचे दुकाने लावत आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्या दुकानदारांची गैरसोय होत आहे. मटण, चिकण व मच्छी विक्रेत्यांनी ग्राम पंचायतीने नेमून दिल्या जागेवर आपला व्यवसाय थाटावा, तसेच मच्छी मार्केटमधील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी भोई समाज बांधवांनी ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी भानोसे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ग्राम पंचायतीने चिकण, मटण व मच्छी व्यवसायिकांना जागा नेमून दिली आहे. मात्र काही दिवसांपासून चिकन मार्केटमधील काही दुकानदार ग्रामपंचायतीने नमूद दिलेल्या जागेवर दुकाने न लावता मच्छी मार्केटसाठी नेमून दिलेल्या जागेवर दुकाने लावत आहे. त्यामुळे मच्छी व्यावसायिकांना जागेची अडचण निर्माण झाली. मच्छी विक्रेत्यांनी आपली दुकाने कुठे लावावी असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे जागेवरुन बरेचादा भांडणही झाले आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी घुग्घुस भोई समाजाचे प्रकाश पचारे, मंगेश पचारे, रा. तु. दिघोरे, राजू कामतवार, सुनिल मांढरे, अशोक कामतवार, रविंद्र पचारे, मारोती बौरवार, अंकुश कामतवार, किसन कामतवार, किसन मांढरे, संतोष कामतवार, विजय कामतवार, विनोद कामतवार, दिलीप कामतवार, गणेश कामतवार, कैलाश कामतवार आदी उपस्थित होते.