शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:17 AM2021-07-05T04:17:57+5:302021-07-05T04:17:57+5:30
फोटो बल्लारपूर : येथील मोन्टफोर्ट स्कूल व्यवस्थापनाने ऑनलाईन शिक्षणाची पूर्ण फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रणाली ग्रुपच्या बाहेर ...
फोटो
बल्लारपूर : येथील मोन्टफोर्ट स्कूल व्यवस्थापनाने ऑनलाईन शिक्षणाची पूर्ण फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण प्रणाली ग्रुपच्या बाहेर केले आहे. यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होत आहेत. यास्तव स्कूल पालक संघर्ष समितीने स्कूल व्यवस्थापनाच्या विरोधात लढा उभारला आहे.
कोरोना संघर्षामुळे शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण शाळेद्वारे दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे व्यवस्थापनाचा शिक्षणावरील खर्च कमी झाला असल्यामुळे शिक्षण शुल्क कमी करणे आवश्यक आहे. मात्र, व्यवस्थापन पूर्ण शुल्क आकारत आहे. कोरोना काळात बऱ्याच जणांचे रोजगार बुडाले आहेत. आर्थिक विवंचनेमुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईनची पूर्ण फी भरली नाही, त्यांना ऑनलाईन प्रणालीतून बाहेर केले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. यास्तव तेथील पालक संघर्ष समितीने ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर येणाऱ्या खर्चानुसारच फी आकारण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, उपसंचालक नागपूर, जिल्हा शिक्षण विभाग, पोलीस निरीक्षक यांना निवेदनातून केली आहे. फी वाढ व इतर काही निर्णय घेताना व्यवस्थापन पालक संघाच्या समितीशी चर्चा करायला हवी. मात्र, तसे केले जात नाही, अशी तक्रार संघर्ष समितीने संबंधित विभागाकडे केली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्थितीत शिक्षण मिळालेच पाहिजे याकरिता पालक संघर्ष समिती संघर्षशील राहील, असे पत्रकार परिषदेत समितीने म्हटले आहे. या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष रितेश बोरकर, कायदेशीर सल्लागार ॲड. पवन मेश्राम इत्यादी उपस्थित होते.
040721\img-20210701-wa0029.jpg
विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मों फोर स्कूल विरोधात पालक संघर्ष समितीचा लढा! फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पासून काढले