आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:00 AM2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:35+5:30

कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.

Renewing Aadhaar card is a headache | आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी

आधार कार्ड नुतनीकरण करणे ठरतेय डोकेदुखी

Next
ठळक मुद्देजन्मतारखेचा उल्लेख गरजेचा : नुतनीकरणासाठी सेवा केंद्रात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय कामात आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र सदर कार्ड अद्यावत असणे गरजेचे असल्याने आधार कार्ड नुतनीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. तर एसटी बस प्रवासात ज्येष्ठांना ५० टक्के सवलतीसाठी अद्यावत आधारकार्डची सक्ती करण्यात येत असल्याने ज्येष्ठांना उतारवयात आधार केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहेत.
कोणत्याही कामात ओळखपत्र म्हणून आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी आधार कार्डवर जन्मतारखेच्या जागी केवळ इ. स. चा उल्लेख होता. दिनांक व महिन्याचा उल्लेख नव्हता. मात्र आता शासनाने आधारकार्डवर दिनांक, महिना व वर्ष असलेलेच आधार कार्ड ग्राह्य पकडण्यात येत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी असलेल्या केंद्रातून आधार कार्डचे नुतनीकरण सुरु आहे. बऱ्याच केंद्रावर नागरिकांची लूट होताना दिसून येत आहे.
आता बस महामंडळामध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी तसेच ५० टक्के सवलत मिळणविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सुधारीत धोरणानुसार बोगस वय नमूद करुन प्रवास करणाऱ्यांची ठकबाजी एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्डप्रणालीमुळे बंद होणार आहे. त्यासाठी आधारचे अद्ययावतीकरण आवश्यक करण्यात आले आहे. एसटी प्रवास सवलत घेणाºया बहुतांश व्यक्ती या आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या गटातील असतात. त्याची चेहरेपटी वय सांगत असले तरी आधारच्या अद्यायवतीकरणाची सक्ती करण्यात आल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. बस प्रवास सवलत योजनेत महामंडळाने गेल्या काही महिन्यापासून विविध अटी टाकल्या आहेत. त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी या अटी जाचक ठरत आहे.

जन्मतारखेच्या सुधारणेसाठी मुंबईवारी
आधार कार्डवरील जन्म वर्ष व दहावीनंतरच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारखेत एक वर्षापेक्षा अधिकचा फरक असल्यास जन्मतारीख दुरुस्ती सेवा केंद्रातून होत नसल्यामुळे सेवा केंद्रधारक मुंबई कार्यालयात जाऊन जन्मतारखेत दुरुस्ती करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका सहन करुन मुंबई येथे जावे लागत आहे. तर ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. त्यातही यूआयडीआय नेहमीच आपल्या आधार कार्ड संदर्भातील नियमात बदल करीत असल्याने व वेळी-अवेळी जाचक अटीमुळे आधारकार्ड आॅपरेटरसुद्धा हैराण झाले आहेत. त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Renewing Aadhaar card is a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.