आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थानाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:27 AM2021-05-24T04:27:28+5:302021-05-24T04:27:28+5:30

चिंधीचक या आदिवासीबहुल गावात असलेल्या आरोग्य उपकेंद्रातील असलेले निवासस्थान राहण्याजोगे नसल्याने व गावातही किरायाने घर मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकारी ...

Renovation of accommodation in the health sub-center | आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थानाचे नूतनीकरण

आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थानाचे नूतनीकरण

Next

चिंधीचक या आदिवासीबहुल गावात असलेल्या आरोग्य उपकेंद्रातील असलेले निवासस्थान राहण्याजोगे नसल्याने व गावातही किरायाने घर मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मुक्कामी राहू शकत नव्हते. परिणामी रुग्णांना वेळेवर उपचारासाठी धावपळ करावी लागत होती. ही अडचण स्थानिक वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थांनी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या निदर्शनास आणून दिली. या बाबीची दखल घेत जि.प.आरोग्य विभागाच्या जिल्हा निधीतून निवासस्थान इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करून मंजुरी घेत त्वरित काम पूर्णत्वास नेले. या नूतनीकरणामुळे आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, चिंधीचकचे सरपंच रवींद्र गायकवाड, उपसरपंच प्रदीप समर्थ, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन कोडापे, भाजपा तालुका महामंत्री जगदीश सडमाके, माजी उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य हरीजी वरठे, ग्रा.पं.सदस्य विश्रांती सातपैसे, चिंधीचकचे ग्रामसेवक रतन वासे यांची उपस्थिती होती.

Web Title: Renovation of accommodation in the health sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.