पारडपार-खापरी रस्त्याची दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:32 AM2021-08-21T04:32:16+5:302021-08-21T04:32:16+5:30

या समस्येकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य व सम्यक विद्यार्थी ...

Repair the paved road | पारडपार-खापरी रस्त्याची दुरुस्ती करा

पारडपार-खापरी रस्त्याची दुरुस्ती करा

Next

या समस्येकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी पारडपार-खापरी मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे व जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रास्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्त्याने पारडपार येथील शेतकरी व शेतमजूर जाणे-येणे करीत असतात व हा मार्ग पारडपारवरून जांभुळघाट व खापरीवरून चिमूरला जाणारा मुख्य मार्ग आहे. निवेदन देताना सरपंच संघाचे चिमूर तालुका अध्यक्ष व उपसरपंच वैभव ठाकरे, सम्यकचे पदाधिकारी नीलेश गावंडे, निखिल रामटेके, संदीप बन्सोड, सूरज धुर्वे व पारडपार येथील शेतकरी ऋषिकेश मोटघरे, शैलेश मेश्राम, विवेक मेश्राम, प्रतीक वाघमारे, स्वप्निल गजभे उपस्थित होते.

Web Title: Repair the paved road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.