१५ दिवसात क्वार्टरची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:45+5:302021-06-06T04:21:45+5:30
३० वर्षांपूर्वी घुग्घुस परिसरातील कोळसा खाण कामगारांसाठी विविध प्रकारचे क्वार्टर बनविले. मात्र त्या क्वार्टरच्या देखभालीकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्या ...
३० वर्षांपूर्वी घुग्घुस परिसरातील कोळसा खाण कामगारांसाठी विविध प्रकारचे क्वार्टर बनविले. मात्र त्या क्वार्टरच्या देखभालीकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. त्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या कामगार व कामगाराच्या जीविताला घोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून वारंवार दुमजली क्वार्टरच्या जिन्याची सुरक्षा भिंती कोसळणे, छतावरील सिलिंग पंखे, प्लास्टर पडणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. गेल्या महिन्यात व दोन दिवसांपूर्वी सुभाष नगरमधील दुमजली इमारतीच्या जिन्याची सुरक्षा भिंत कोसळली. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.
यापुढे अशा घटनाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शनिवारी येथील भाजयुमोच्या वतीने व्यवस्थापकांना निवेदन देऊन १५ दिवसात सर्व जीर्ण क्वार्टरची दुरुस्ती काम सुरू न केल्यास कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा बोढे यांनी दिला आहे. यावेळी उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश सचिव संजय तिवारी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोदशेलवार, वाहतूक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी उपस्थित होते.