रस्त्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:32 AM2021-03-01T04:32:20+5:302021-03-01T04:32:20+5:30
गर्दीवर नियंत्रण नाही चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाराराज गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे असले तरी ...
गर्दीवर नियंत्रण नाही
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाराराज गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. असे असले तरी नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. बाजारामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे अधिकाधिक दंड आकारून त्यांना शिस्त लावावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.
बेरोजगारांच्या अडचणीत वाढ
चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरतीवर बंद आहे. कोरोनाचे सावट असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न ्रनिर्माण झाला आहे. अडचण लक्षात घेऊनच कर्जवितरण करावे, अशी मागणी केली जात आहे.
शेती रस्त्याची माेजणी करावी
चंद्रपूर : ग्रामीण भागातील पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पांदण रस्ते व गावाची शिव आता संकटात आहे. त्यामुळे प्रशासनाने गावागावातील पांदन तसेच शेतरस्त्यांची मागणी करून सीमारेशा आखून द्याव्या, अशी मागणी केली जात आहे.
योजनांपासून शेतकरी वंचित
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकरी कर्जमाफी व ओला दुष्काळ नुकसानभरपाई लाभापासून अद्यापही वंचित आहे. त्यामुळे सदर लाभ त्वरित केंद्र व राज्य शासनाने द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे.
तज्ज्ञाअभावी रुग्णांची गैरसोय
कोरपना : येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ नाही. परिणामी महिला रुग्णाची गैरसोय होते आहे. त्यामुळे येथील रुग्णांना उपचारासाठी राजुरा, वणी, चंद्रपूर, आदिलाबाद, नागपूर येथे जावे लागते आहे. त्यामुळे येथे तज्ज्ञ डॉक्टराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नागपूरसाठी बस सुरू करावी
कोरपना : येथून नागपूरला जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नाही. परिणामी प्रवाशांना वणी किंवा राजुरा येथे जाऊन बस पकडावी लागते. सद्य:स्थितीत गडचांदूर येथून नागपूरसाठी अनेक बसेस आहेत.