काळे कृषी कायदे रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:41 AM2020-12-16T04:41:55+5:302020-12-16T04:41:55+5:30
गोंडपिपरी : केंद्र शासनाने कृषी क्षेत्राशी संबधित विधेयक मंजूर केले. हे विधेयक रद्द करावे, या मागणीच्या पूर्ततेसाठी ...
गोंडपिपरी : केंद्र शासनाने कृषी क्षेत्राशी संबधित विधेयक मंजूर केले. हे विधेयक रद्द करावे, या मागणीच्या पूर्ततेसाठी देशभरातील शेतकरी पेटून उठले आहेत. या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला पाठींबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेने शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून कली.
मागील काही दिवसांपासून दिल्ली येथे शेतकरीबांधव आंदोलन करीत आहेत. सरकार मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिरंगाई करीत आहे. एवढेच नाही तर केंद्र सरकारमधील काही मंत्री आंदोलक शेतकऱ्यांना पाकिस्तानी संबोधून शेतकरी बांधवांचा अपमान करीत आहे. देशातील तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक तातडीन मागे घ्यावे, अशी मागणी किसान सभा गोंडपिपरीने निवेदनातून केली. यावेळी किसान सभा गोंडपिपरीचे अध्यक्ष आकाश चौधरी, संतोष खोब्रागडे, किशोर चौधरी, मोरेश्वर खरबनकार आदी उपस्थित होते.