मजूर नोंदणी लाभातील दलालांवर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:21 AM2019-08-07T00:21:32+5:302019-08-07T00:21:48+5:30

महाराष्ट्र इमारत बांधकाम मजुरांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाकरिता मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नोंदणी सुरू आहे. मात्र सर्व सामान्य मजुरांना मजुर नोंदणी व त्यासोबतच इतर लाभ मिळवुन देण्यासाठी दलाल सक्रीय झाले असुन त्यांच्याकडून मजुरांचे आर्थिक शोषण होत आहे.

Report crimes against brokers in labor registration benefits | मजूर नोंदणी लाभातील दलालांवर गुन्हे नोंदवा

मजूर नोंदणी लाभातील दलालांवर गुन्हे नोंदवा

Next
ठळक मुद्देस्वराज्य बांधकाम कामगार संघटनेची मागणी : विविध मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : महाराष्ट्र इमारत बांधकाम मजुरांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाकरिता मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नोंदणी सुरू आहे. मात्र सर्व सामान्य मजुरांना मजुर नोंदणी व त्यासोबतच इतर लाभ मिळवुन देण्यासाठी दलाल सक्रीय झाले असुन त्यांच्याकडून मजुरांचे आर्थिक शोषण होत आहे. मजुरांचे शोषण करणाऱ्या या दलालांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेने केली असून यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये चिमूर जिल्ह्याची निर्मिती करुण सहाय्यक कामगार आयुक्त नियुक्त करावा, सोईच्या ठिकाणी नोंदणी शिबिर आयोजित करावे, नोंदणी अधिकांºयाना प्रशिक्षण देऊन १०० कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश द्यावे, हलगर्जी करणाºया अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, नोंदणी व लाभाकरिता स्वतंत्र यंत्रणा असावी, ६० वर्षावरील नोंदणीकृत कामगारांना सहा हजार रुपये मासिक पेन्शन द्यावे, शासन निर्णय व परिपत्रक विनामूल्य द्यावे, लाभ देण्याकरिता तत्काळ कृति कार्यक्रम राबवावा. भ्रष्टाचारमूक्त प्रक्रियेसाठी प्रत्येक नोंदणी कार्यालयात व जिल्हा कार्यालयात अशासकीय सदस्य कामगार संघटनेतुन निवडावा, राज्याच्या बांधकाम कल्याणकारी मंडळावर संघटनेचा प्रतिनिधी नियुक्त करावा, माहिती शिबिराकरिता ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध करूण द्यावे, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर कामगार भवन बनवावे, नोंदणी शिबिराचे वेळापत्रक वेळेपूर्वी द्यावे, संच पुरवठादार कंपनीची चौकशी करावी अशा विस मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष धनराज गेडाम, सचिव देवचंद टेंभूरकर, नरेश पिल्लेवान, कोषाध्यक्ष शारदा गेडाम, राकेश लांजेवार, सुरजपाल, गुरुदास सोनटक्के, गजानन शेडामे, प्रशांत घुग्घुसकर, प्रतिक गेडाम, मनोज राऊत, नितिन घुग्घुसकर, विलास घोडमारे, प्रमोद गजभे यांच्यासह मोठ्या संखेने संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलनाचा इशारा
१६ आॅगस्ट चिमूर क्रांती दिनी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे , ३१ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व ९ सप्टेंबरला मंत्रालयावर मोर्चा अश्याप्रकारे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संघटनेने शासनाला दिला आहे .

Web Title: Report crimes against brokers in labor registration benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Labourकामगार