भारिप बहुजन महासंघातर्फे आयुक्तांना निवेदन

By admin | Published: June 4, 2016 12:49 AM2016-06-04T00:49:02+5:302016-06-04T00:49:02+5:30

चंद्रपूर महानगरपालिका झाल्यावर काही चमत्कार होईल, शहराचा विकास होईल, शहर सुजलाम्-सुफलाम् होईल,

Request to the Commissioner by Bharip Bahujan Mahasangh | भारिप बहुजन महासंघातर्फे आयुक्तांना निवेदन

भारिप बहुजन महासंघातर्फे आयुक्तांना निवेदन

Next

चंद्रपुरातील समस्यांकडे लक्ष वेधले : दखल घेण्याची मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका झाल्यावर काही चमत्कार होईल, शहराचा विकास होईल, शहर सुजलाम्-सुफलाम् होईल, ही चंद्रपूर शहरवासीयांची अपेक्षा होती. आज महानगरपालिका झाल्यावर चार वर्षापेक्षा जास्त काळ निघून गेला आहे. परंतु, केवळ पालिकेचे नामांतर झाले. मात्र येथील रहिवाशांचे मूलभूत समस्या जैसे थे आहेत.
गुरुवारी महानगरपालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर यांना भारिप बहुजन महासंघातर्फे चंद्रपुरातील विविध ज्वलंत समस्यांचे निवेदन देण्यात आले. यात चंद्रपूर महानगरातील पाण्याची समस्या सोडविणे, बाबुपेठ उड्डाण पुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करणे, वाढीव मालमत्ता कर कमी करणे, बाबुपेठ बायपास रोडवर आंबेडकर चौकात हॉयमॉक्स लाईट लावणे, बाबुपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळ्याजवळ हॉयमॉक्स लावने, बाबुपेठ परिसरात बालोद्यान व बगीचा निर्मिती करणे, बाबुपेठ आंबेडकरनगर प्रभागातील हनुमान मंदिरासमोर सार्वजनिक रस्त्यावर सिमेंट खंबे उभे करून बंद केलेला सार्वजनिक रस्ता पुर्ववत सुरू करणे, नगिनाबाग वार्डातील सुगतनगर, प्राध्यापक कॉलनी, बुद्ध वसाहत, गुलमोहर कॉलनी, शेंडे लेआऊट येथील संपूर्ण रस्त्याची रोडचे कामे पूर्ण करणे व नाल्याचे बांधकाम पूर्ण करणे, भिवापूर वॉर्डातील अतिक्रमण हटविणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी कुशल मेश्राम, सुरेश नारनवरे, धीरज बांबोळे, आकाश रायपुरे, लता साव, राजू किर्तक, रूपचंद निमगडे, कल्पना अलोने, तनुजा रायपुरे, बंडू ठेंंगरे, तेजराज भगत, नंदा रंगारी, वनमाला सुखदेवे, अम्रपाल उराडे, अनिता रंगारी, राहुल सरदार, नामदेव रंगारी, अरुण अलोणे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Request to the Commissioner by Bharip Bahujan Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.