प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Published: October 27, 2016 12:53 AM2016-10-27T00:53:04+5:302016-10-27T00:53:04+5:30

सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बल्लारपूर क्षेत्राच्या वेकोलिच्या विरोधात ....

Request to District Collectors of Project Affected Farmers | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next

राजुरा : सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली, भंडागपूर, माथरा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बल्लारपूर क्षेत्राच्या वेकोलिच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना अखेरचे निवेदन देऊन आता तरी लक्ष देण्याची मागणी केली आहे.
सास्ती-धोपटाळा ८ असा नवीन उपक्रम वेकोलि प्रशासनामार्फत सुरू करण्यात येत आहे. यात सुमारे ८२७.७२ हेक्टर शेती अधिग्रहीत करणार असून संबंधीत सर्व प्रकारची प्रक्रिया पूर्ण होऊन २० महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र या उपक्रमाबद्दल कुठलीही कारवाई करण्यास वेकोलि मार्फत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी आणि शेतीचा मोबदला लवकरात लवकर द्यावा, याकरिता येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी संबंधीत कार्यालयात चकरा मारीत आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी निराशा येत असल्याने माहिती येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. डिसेंबर पर्यंत याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Request to District Collectors of Project Affected Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.