विविध शैक्षणिक समस्यांवर मुख्याध्यापक संघाचे निवेदन

By admin | Published: July 17, 2016 12:44 AM2016-07-17T00:44:26+5:302016-07-17T00:44:26+5:30

जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे विविध शैक्षणिक समस्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना देण्यात आले.

Request for Head Teacher's Association on various educational issues | विविध शैक्षणिक समस्यांवर मुख्याध्यापक संघाचे निवेदन

विविध शैक्षणिक समस्यांवर मुख्याध्यापक संघाचे निवेदन

Next

शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा : जि.प., न.प. शाळेमध्ये पाचवी व आठवी सरसकट नको
चंद्रपूर : जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे विविध शैक्षणिक समस्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना देण्यात आले.
मुख्याध्यापकांना शासनाच्या घातक निर्णयामुळे विविध समस्याला सामोरे जावे लागत आहे. त्याच अनुषंगाने काही प्रमुख समस्या घेऊन शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने जि.प. व न.प. शाळेमध्ये इयत्ता पाचवी व वर्ग आठवी सरसकट सुरू न करता आर.टी.ई. अ‍ॅक्टमधील अंतराच्या अटीनुसार वर्ग सुरू करणे, शालेय पोषण आहार योजना पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन सुरू ठेवणे, सन २०१५-१६ मधील सुधारित संच मान्यतेनुसार पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापकाची पदे संच मान्यतेमध्ये समाविष्ठ करून देण्याबाबत, अनुदानास पात्र म्हणून घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्वरित वेतन अनुदान मिळण्याबाबत, विनाअनुदानीत उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मिळण्याबाबत आय. सी. टी. लॅब अंतर्गत शाळेला सी.सी. टीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देणे, २०१५-१६ नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करणेबाबत निवेदन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पाठविण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांना सादर केले.
निवेदन देताना मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीधर फटाले, कोषाध्यक्ष नरेंद्र बोबडे, उपाध्यक्ष पुंडलीक उराडे, स्मिता ठाकरे, संध्या गोहोकार, छाया मोहीतकर, राजू पारोधे, राजेश सावरकर, प्रदीप गर्गेलवार, प्रभाकर डोंगरे, अरविंद राऊत, अनिल मुसळे, एस. शिंदे, श्रीधर काळे, अनिता पंधरे, रेणुका झंझाड, आशा दाते, मोहन संतोषवार, रवींद्र कुकुडवार, राठोड आदी मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

आरटीईची अंमलबजावणी करा
नगर परिषद व जिल्हा परिषदांच्या माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवा व इयत्ता आठवा वर्ग सरसकट सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेला विद्यार्थ्यांची समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शिक्षण हक्क कायद्यामध्ये निश्चित असे अंतर राखून शाळा सुरू करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या धोरणाचा उपयोग पाचवा व आठवा वर्ग सुरू करतानाही करावा, असे जिल्हा मुख्याध्यापक संघाला वाटते. तशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Web Title: Request for Head Teacher's Association on various educational issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.