कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांची सुटका, दोघांना अटक
By राजेश मडावी | Published: September 12, 2023 04:27 PM2023-09-12T16:27:46+5:302023-09-12T16:30:31+5:30
अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार
चंद्रपूर : तेलंगणा राज्यात कत्तलखान्यात जाणाऱ्या २८ जनावरांची बल्लारपूर पोलिसांनी सोमवारी (दि. ११) रात्री आठ वाजता टोलनाक्यावरून सुटका केली. या प्रकरणी दोघांना अटक झाली. एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. शेख अहमद शेख मुर्तजा (२५), शेख इस्माईल शेख हुसेन (२४, दोघेही बल्लारपूर) अशी आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेतलेली जनावरे लोहारा येथील उज्ज्वला गौरक्षण संस्थेत संगोपनासाठी नेण्यात आल्या आहेत.
जनावरांची तस्करी सुरू असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. रात्री गस्ती घालत असताना विसापूर टोलनाक्याजवळ (एमएच ३४ एबी ३१८२) क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता चंद्रपूरवरून तेलंगणा राज्यात अवैधरीत्या १५ गायी, ११ गोरे व दाेन बैल असे एकूण २८ गोवंश कत्तलीसाठी नेले जात होते. जनावरांचे पाय दोरीने बांधून ट्रकमध्ये कोंबून ठेवले होते. पोलिसांनी शेख अहमद शेख मुर्तजा व शेख इस्माईल शेख हुसेन (२४, रा. राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपूर) यांना अटक केली तर एक आरोपी फरार आहे. जनावरे व ट्रकसह एकूण १३ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सलीम शेख करीत आहेत.