वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका, दोघांना अटक

By परिमल डोहणे | Published: April 21, 2023 04:35 PM2023-04-21T16:35:00+5:302023-04-21T16:36:25+5:30

पडोली पोलिसांची कारवाई 

Rescue of animals for slaughter in vehicle, two arrested by padoli police | वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका, दोघांना अटक

वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका, दोघांना अटक

googlenewsNext

चंद्रपूर : आयशर वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या १९ जनावरांची सुटका करुन पडोली पोलिसांनी दोघांना अटक केली. गुरुवारी मध्यरात्री साखरवाही टोल नाक्यावर नाकाबंदी करुन पोलिसांनी ही कारवाई केली. अब्दुल अजीज अब्दुल रऊफ (२७), जुबेर अहमद गुलाब रसूल कुरेशी (४०) दोघेही रा. गडचांदूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर मुजममील खॉ वाहाब खॉ (२४) रा. गडचांदूर हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत सुमारे दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आयशर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लगेच साखरवाही टोल नाका येथे नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन आयशर (एमएच २७, ५८३५) येताच पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले. पोलिसांनी वाहनचालक व वाहक या दोघांना अटक केली तर सोबतच एकजण पोलिसांना पाहून फरार झाला.

पोलिसांनी जनावरांसह दहा लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात प्रकाश निखाडे, कैलास खोब्रागडे, विनोद वनकर, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पकंज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.

Web Title: Rescue of animals for slaughter in vehicle, two arrested by padoli police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.