पडोलीत तीन बालकामगारांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 03:32 PM2023-06-14T15:32:05+5:302023-06-14T15:32:59+5:30

चंद्रपुरानजीक पडोली येथे तीन बालकामगार काम करताना आढळून आले.

Rescue of three children on Child Labor Day; A case has been registered against both | पडोलीत तीन बालकामगारांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा

पडोलीत तीन बालकामगारांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

चंद्रपूर : बालकामगारांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने जागतिक बालकामगार विरोधी दिनी चंद्रपुरातील पडोली येथील बिट्टू नागी बॉडी बिल्डर वर्क्स व कश्मिरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप लखमापूर या धोकादायक उद्योगामध्ये काम करणाऱ्या तीन बालकामगारांना ताब्यात घेऊन व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुले स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार, कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ सफाई करायची, भांडी कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे, अशी अनेक कामे करावी लागतात. जागतिक बालकामगार विरोधी दिनी जिल्हाधिकारी कार्यालय व सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून कामगार उपायुक्त एम. पी. मडावी यांच्या मार्गदर्शनात दुकाने निरीक्षक गायत्री दुबे व त्यांच्या चमूंनी धाडसत्र राबविले.

यावेळी चंद्रपुरानजीक पडोली येथील बिट्टू नागी बॉडी बिल्डर वर्क्स व कश्मिरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप लखमापूर या धोकादायक ठिकाणी तीन बालकामगार काम करताना आढळून आले. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन बिट्टू नागी बॉडी बिल्डर वर्क्सच्या मालकावर पडोली पोलिस ठाण्यात तर कश्मिरा मोटर गॅरेज रिपेरिंग वर्कशॉप लखमापूरच्या मालकावर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालकामगार प्रतिबंधक व नियमन कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आढळून आल्यास फौजदारी गुन्हा व दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे कुणीही बालकामगारांकडून काम करवून घेऊ नये. कुठे बालकामगार राबत असल्यास कामगार आयुक्त कार्यालयाला माहिती द्यावी.

- एम. पी. मडावी, कामगार उपायुक्त, चंद्रपूर

Web Title: Rescue of three children on Child Labor Day; A case has been registered against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.