गळ्यात फास घेऊन फिरणाऱ्या वाघिणीच्या शोधार्थ रेस्क्यू टीम जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:01+5:302021-06-18T04:20:01+5:30

प्रवीण खिरटकर वरोरा (चंद्रपूर) : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी जंगलात एक वाघीण गळ्यात फास घेऊन मागील २४ ...

Rescue team in the forest in search of a tiger with a noose around its neck | गळ्यात फास घेऊन फिरणाऱ्या वाघिणीच्या शोधार्थ रेस्क्यू टीम जंगलात

गळ्यात फास घेऊन फिरणाऱ्या वाघिणीच्या शोधार्थ रेस्क्यू टीम जंगलात

Next

प्रवीण खिरटकर

वरोरा (चंद्रपूर) : वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी जंगलात एक वाघीण गळ्यात फास घेऊन मागील २४ दिवसापासून फिरत आहे. तिच्या गळ्यातील फास काढण्याकरता वनविभागाची रेस्क्यू टीम सालोरी जंगलात दाखल झाली आहे. ही टीम जंगलात फिरत आहे, परंतु वाघीण सातत्याने हुलकावणी देत असल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे.

वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सालोरी जंगलातील कक्ष क्रमांक ११ मध्ये लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये एक वाघीण गळ्यात फास घेऊन फिरत असल्याचे दिसून आल्यानंतर वनविभाग सतर्क झाला व मागील २४ दिवसापासून शोध मोहीम सुरू केली. काही दिवसांपूर्वी जंगलात तिच्या पायाचे ठसे आढळून आले. जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये गळ्यात फास नसलेली वाघीण दिसून आली. मात्र गळ्यात फास असलेली वाघीण ती नाही, हे वनविभागाला कळले असावे. म्हणूनच वाघिणीच्या शोधार्थ आता रेस्क्यू पथक जंगलात दाखल झाले आहे. सदर पथक सतत जंगलात सर्च मोहीम राबवत आहे. परंतु ही वाघीण अद्यापही गवसली नाही. वाघीण वावरत असलेल्या परिसरात वन्यप्राणी व पाळीव प्राण्याची शिकार झाली नसल्याचे समजते. त्यामुळे वाघीण इतके दिवस उपाशी राहू शकते का, असा प्रश्न पडला आहे.

Web Title: Rescue team in the forest in search of a tiger with a noose around its neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.