संशोधन व तंत्रज्ञान शेतात पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 10:00 PM2018-10-07T22:00:01+5:302018-10-07T22:00:39+5:30
विद्यापीठाचे नाविण्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले. केद्र शासनाच्या धोरणानुसार कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे गुरूवारी त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : विद्यापीठाचे नाविण्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले. केद्र शासनाच्या धोरणानुसार कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे गुरूवारी त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ना. अहीर पुढे म्हणाले, जवस, कुलथा, लाख ही परिसरातील पारंपारिक पिके असून अधिक प्रथीनेयुक्त हे अन्न असल्याने त्यांच्या लागवडीचे स्त्रोत वाढविण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे.
तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक व शेतकºयांना प्रक्रिया उद्योग, कुक्कुटपालन, दुग्धउत्पादन व शेळीपालनसाठी प्रोत्सोहित करावे, असेही आवाहन उपस्थित अधिकाºयांना केले. सुबाभूळ व शेवगा हे शेळीसाठी उपयुक्त चारा असल्याने सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून त्याची लागवड पडीक जमिनीवर करावी व शेळीपालनातील खाद्यावर होणारा खर्च कमी करावा, असेही त्यांनी यावेळी सूचविले. कृषी विज्ञान केंद्राचा आर्थिक अहवाल पाहता पगार व इतर भत्ते यात ९१ टक्के तर विस्तार योजनांवर केवळ ९ टक्के हे गुणोत्तर पाहून ना. अहीरांनी आश्चर्य व्यक्त केले. विस्तार योजनांवर अधिक निधी मागून लक्षांकात वाढ करण्याचे निर्देश दिले.
माती परिक्षण, प्रशिक्षण, भेटी व इतर विस्तार योजनांवर कमी काम दिसत असल्याने असमाधान व्यक्त करून या संदर्भात पंजाबराव कृषी विद्यापीठाला अहवाल कळविण्यात येईल, असे बैठकीत सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त कापूस एक लाख ८२ हजार ७०० हेक्टर भात एक लाख ५० हजार ५०० हेक्टरवर लागवडीखाली आहे.
त्यामुळे कृषी तंत्राज्ञान व संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता अधिक प्रयत्न करावे लागेल, असे अधिकाºयांना सूचविले. सदर बैठकीला गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, जि. प. सदस्य संध्या गुरनुले, कमलाकर सिद्दमशेट्टीवार, प्रभाकर भोयर, किसान विज्ञान केंद्राचे प्रमुख नागदेवे व इतर अधिकारी तसेच प्रयोगशील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.