२५० वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन पाच महिन्यांपासून रखडले

By admin | Published: June 14, 2014 01:53 AM2014-06-14T01:53:13+5:302014-06-14T01:53:13+5:30

राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे.

Reservation of 250 resident employees has remained for five months | २५० वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन पाच महिन्यांपासून रखडले

२५० वसतिगृह कर्मचाऱ्यांचे मानधन पाच महिन्यांपासून रखडले

Next

लखमापूर : राज्यात सन २००४ पासून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहात काम करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास

२५० कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासूनचे मानधन अद्यापही थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण व शहरी भागात विविध शाळांमध्ये

शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय एन.टी. आदी विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था या वस्तीगृहाअंतर्गत करण्यात येते. यासाठी ज्या

संस्थाअंतर्गत हे वसतिगृह चालविण्यात येत आहे, त्या संस्थांना प्रती विद्यार्थी ९०० ते ९५० रुपये प्रती माह खर्च समाजकल्याण जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येतो. मात्र

यामध्ये कमालीची अनियमितता असल्याचे समजते. जिल्ह्यात अशा प्रकारचे ६७ वसतिगृह असून यामध्ये २४ ते २८ विद्यार्थ्यांची प्रति वसतिगृह अशी संख्या आहे. विद्यार्थ्यांना

राहण्याची उत्तम व्यवस्था, भोजन, मुलभूत सुविधा आणि नियंत्रणासाठी प्रत्येक वसतिगृहात एक अधिकारी, मदतनिस किंवा स्वयंपाकी ठेवण्यात आला आहे. गेल्या १०

वर्षापासून हे कर्मचारी वसतिगृहात काम करीत असून त्यांना स्थायी करुन कायमस्वरूपी वेतन देण्यात येत नाही. मानधनावरच समाधान मानावे लागत आहे.
यातही दर महिन्याला मानधन दिले जात नसल्याने कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण कसे पार पाडायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांपुढे उभा आहे. राज्यामध्ये साधारणता १० हजार

८०० कर्मचारी वसतीगृहात कार्यरत आहेत. काही जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात येत असताना चंद्रपूर जिल्ह्यात हे मानधन थकीत का

ठेवले जाते, हा प्रश्न आहे.. सेवेत कायमस्वरूपी रुजू करुन शासननियमानुसार वेतन देण्यात यावे, यासाठी कर्मचारी संघटनेमार्फत आंदोलने करण्यात आली. त्यात

महिन्याला मानधन वेळेवर द्यावे, अशीही मागणी होती. मात्र याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून कर्मचारी व संस्थाचालकांना वारंवार संबंधित कार्यालयापुढे चकरा

मााव्या लागत आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे, शहरात राहण्याची भोजनाची मोफत सुविधा द्यावी, हा शासनाचा यामागचा उद्देश आहे. मात्र सदर वसतीगृहात रात्रदिवस विद्यार्थ्यांना

सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटाचे काय, असा सवाल कर्मचारी आता करीत आहे. एकीकडे महागाईने रुद्ररुप धारण केले आहे. तर दुसरीकडे तुंटपुज्या मानधनासाठी

कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्यापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Reservation of 250 resident employees has remained for five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.