नगरपालिकांचे आरक्षण जाहीर
By admin | Published: July 3, 2016 01:10 AM2016-07-03T01:10:26+5:302016-07-03T01:10:26+5:30
नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होऊ घातली आहे.
प्रभागनिहाय आरक्षण : बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा नगरपालिका
चंद्रपूर : नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, मूल, राजुरा नगरपालिकांच्या सभागृहात सबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज शनिवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. मागील वर्षीप्रमाणे महिलांसाठी ५० टक्के आरक्षण या सोडतीतही ठेवण्यात आले आहे.
बल्लारपुरातील एकूण १६ प्रभागातील ३२ उमेदवारांच्या निवडीसाठी शनिवारी येथील नगरपालिकेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी कल्पना निळ यांच्या अध्यक्षतेखाली जातीनिहाय संवर्गातील पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती महिला ५, अनुसूचित जमाती एक, नागरिकांचा मागास प्रवर्ग ५ व सर्वसाधारण प्रवर्गातील ५ अशा एकूण १६ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या.
बल्लारपूर नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी १६ प्रभाग निश्चित करण्यात आले. एका प्रभागातून दोन उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे. यासाठी अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमाती दोन, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ९ आणि सर्वसाधारणसाठी १२ असे एकूण ३२ नगरसेवकांच्या निवडीसाठी आरक्षण सोडत प्रिती शिवराम गेडाम व सुजल दिलीप कोरडे या बालकांच्या हस्ते काढण्यात आले. आरक्षण सोडतीत प्रभाग एक- अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग दोन- अ- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग तीन-अ- अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग चार-अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग पाच-अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सहा-अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सात-अ- अनुसूचित जाती महिला, ब- ओबीसी, प्रभाग आठ-अ- अनुसूचित जाती महिला, ब- ओबीसी, प्रभाग नऊ-अ- ओबीसी, ब- सर्वसाधारण महिला असे आरक्षण राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रभाग १० अ मध्ये अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ मध्ये अ- अनुसूचित जमाती महिला, ब-ओबीसी, प्रभाग १२ मध्ये अ- अनुसूचित जमाती, ब- ओबीसी महिला, प्रभाग १३ मध्ये अ- अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग १४ मध्ये अ- अनुसूचित जाती महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १६ मध्ये अब- अनुसूचित जाती, ब- सर्वसाधारण महिला यानुसार आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
वरोरा नगरपालिकेच्या १२ प्रभागांसाठी आरक्षण काढण्यात आले. यात प्रभाग १ मध्ये अ-अनुसूचित जमाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग २ मध्ये अ-ओबीसी महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ३ मध्ये अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ४ मध्ये अनुसूचित जमाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ५ मध्ये अ-ओबीसी, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ मध्ये अ-ओबीसी महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ७ मध्ये अ-अनुसूचित जाती महिला, ब-सर्वसाधारण, प्रभाग ८ मध्ये अ-ओबीसी, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ मध्ये अनुसूचित जमाती, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग १० मध्ये अ-अनुसूचित जाती, ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ मध्ये अ-ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग १२ मध्ये अ-ओबीसी, ब-सर्वसाधारण महिला, असे आरक्षण काढण्यात आले. आरक्षण जाहीर झाल्याने आता पालिका क्षेत्रात राजकीय मोर्चेबांधणीलाही वेग आला आहे. (संबंधित वृत्त/४)