‘स्मार्ट कार्ड’ काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:51 AM2019-07-11T00:51:16+5:302019-07-11T00:53:29+5:30
ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कॉर्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर कॉर्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील चार आगारामध्ये जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात प्रवासासाठी स्मार्ट कॉर्ड योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र सदर कॉर्ड काढण्यासाठी जिल्ह्यातील चार आगारामध्ये जावे लागत आहे. मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने ज्येष्ठांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्ट कॉर्डचे वितरण तालुका मुख्यालयी करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठांकडून होत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना आधार कॉर्ड दाखवून राज्य महामंडळातर्फे सवलतीच्या दरात प्रवास होत होता. परंतु, राज्य मार्गावरून प्रवास करताना एसटी महामंडळाची स्मार्ट पास अनिवार्य करण्यात आले आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी चंद्रपूर, वरोरा, राजुरा व चिमूर बस आगारामध्ये ज्येष्ठांना स्वत: उपस्थित राहून स्वत:चा अंगठा देऊन कार्ड काढावे लागते. परंतु आगारामध्ये संतत लिंकफेल राहत असते. परिणामी ज्येष्ठांना रांगेत तासनतास ताडकळत उभे राहावे लागते. बहुतेक ज्येष्ठांना पुर्वी पायाचे घुटणे, कमर दुखणे, असा नानाविध आजार आहेत. त्यामुळे जेष्ठांना सतत रांगेत राहणे जळ जात असून भोवळ येऊन पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे. सावली तालुक्यात १११ गावांचा समावेश आहे. बहुतेक गावांना आजही बैलबंडी, सायकल व पायदळ प्रवास करावा लागतो. तालुक्यापासून ५० किलोमीटर गावे आतमध्ये आहेत. तालुक्याच्या ठिकाणी येताना त्यांना १२ वाजतात.तेथून जिल्ह्याच्या ठिकाण गाठताना २ वाजतात. सतत लिंकफेलमुळे चार ते पाच चकरा माराव्या लागतात. तरीही काम पूर्ण होत नाही. या वयात शरीर ही साथ देत नाही .ये-जा करण्यात पैसा व वेळही वाया जातो. परत जाताना वाहतुकीचे साधन नाही. संपूर्ण परिसर जंगली भागाने वेढला आहे.
त्यामुळे मानववन्यजीव संघर्षाच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुका मुख्यालयी स्मार्ट कार्डचे वितरण करावे, अशी मागणी सरपंच तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उषा भोयर यांनी आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.
संतगाडगेबाबा संस्थेचे पालकमंत्र्यांना निवेदन
बल्लारपूर : येथील ज्येष्ठांना स्मार्ट कार्डसाठी राजुरा आगारामध्ये जावे लागते. परिणामी त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे बल्लारपूर बसस्थानकावर स्मार्टकार्डचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी श्री संत गाडगेबाबा महाराज जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांना निवेदनातून केली आहे.