मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक समस्या सोडवा
By admin | Published: September 19, 2015 01:16 AM2015-09-19T01:16:09+5:302015-09-19T01:16:09+5:30
जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी
चंद्रपूर : जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासन एकामागून एक नवनविन शासन निर्णय काढत आहे. यामध्ये शाळेसाठी अतिशय अन्यायकारक शासन निर्णय नुकताच २८ आॅगस्ट रोजी निर्गमित केला. या निर्णयामुळे शाळेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वर्ग ८ ते १० मधील मुख्याध्यापकाचे पद धोक्यात आले आहेत. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा, शासनाने अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांंना त्वरीत वेतन अनुदान देण्यात यावे, आॅनलाईन मूल्यांकन झालेल्या उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाळांंना त्वरीत अनुदान मंजूर करण्यात यावे, सरल डेटाबेसच्या बाबतीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळात शाळांनी चुकीची माहिती भरल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना जेलमध्ये टाकू असे अपमानजनक वक्तव्य केले. याचा निषेध नोंदविणे इत्यादी समस्याचे व अपमान जनक वक्तव्य मागे घेण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे देण्यात आले.
यावेळी सचिव राजू साखरकर , कोषाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, सदस्य प्रदीप गर्गेलवार, प्रशांत दौंंतुवार, मधुकर मुपीडवार, राजेश सावरकर, बाबुराव सेन आदीच्या नेतृत्त्वा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार अॅड. संजय धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)