भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:30 PM2019-02-18T22:30:44+5:302019-02-18T22:31:02+5:30

काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Resolve for the glory of Mother India | भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा

भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : शहिदांना श्रद्धांजली अर्पण करीत विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : काश्मिरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संपूर्ण देश अशा वेळी सैन्यदलांच्या पाठीशी आहे. मात्र आमची देशभक्ती, देशाप्रतीची भावना आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो. त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करण्यातून सिद्ध करण्याची वेळ आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठी प्रयत्न करूया. भारत मातेच्या गौरवासाठी संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर महानगरातील भानापेठ प्रभागातील पीएच नगर परिसरातील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व नालीचे बांधकामाच्या भूमिपूजन व भानापेठ मधील माता मंदिर परिसरातील अन्य एका रस्त्याचे भूमीपूजन केल्यानंतर ते नागरिकांशी संवाद साधत होते. व्यासपीठावर आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले, नगरसेवक संजय कंचर्लावार, आशा आबुजवार, राजीव अडपेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, शितल कुळमेथे आदी उपस्थित होते.
भानापेठ परिसरातील पीएच नगरात ११० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. तसेच या ठिकाणी २०० चौरस मीटर परिसरात एका बगीच्याचे देखील सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. ५० लाख रुपयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच भानापेठ क्रमांक ११ मधीलच माता मंदिर परिसरातील भूमीगत नाली व रस्त्याचे ३० लाख रुपयांचे बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नागरिकांनी उर्वरित कामांसाठी निवेदने दिलीत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद जवानांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. त्यानंतर बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यासाठी सुरू केलेल्या वेगवेगळ्या मिशनची माहिती दिली. आपल्या वार्डातील व परिसरात गरिबी रेषेच्या खाली येणाऱ्या नागरिकांसाठी दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य उपलब्ध करणारे मिशन दिनदयाल सुरू करण्यात आले आहे. जे गरीब असतील त्या सर्वांना यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. अशा सर्व नागरिकांची माहिती गोळा करणे नगरसेवकाला माहिती देणे या कामातही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिशन सेवा, मिशन शक्ती सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मिशन मंथनच्या माध्यमातून १०० आदिवासी युवकांना उद्योजक बनवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अमृत योजनेची कामे पूर्ण केल्यानंतर रस्ते करावेत, अशी सूचना महापौर घोटेकर यांना दिल्या. संचालन उमा कुकुडवाड यांनी केले.

Web Title: Resolve for the glory of Mother India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.