अल्पसंख्यक समुदायांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:32 PM2018-12-17T22:32:42+5:302018-12-17T22:33:05+5:30

केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक समुदायाच्या संदर्भात असणाऱ्या सर्व योजना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लागू होतील. तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे जे प्रस्ताव प्रलंबित असतील, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा अल्पसंख्यांक आयोग करेल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सोमवारी दिले.

Resolve the question of minority communities in priority | अल्पसंख्यक समुदायांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार

अल्पसंख्यक समुदायांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार

Next
ठळक मुद्देहाजी अराफत शेख : जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक समुदायाच्या संदर्भात असणाऱ्या सर्व योजना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लागू होतील. तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समुदायाचे जे प्रस्ताव प्रलंबित असतील, त्या प्रस्तावाचा पाठपुरावा अल्पसंख्यांक आयोग करेल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी सोमवारी दिले.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा जिल्ह्यातील पहिला दौरा होता. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना आपण भेट देत असून त्या ठिकाणच्या अल्पसंख्यांक समुदायाच्या समस्या जाणून घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या राज्यस्तरीय दौºयातील ही १६ व्या जिल्हयाची भेट आहे. संपूर्ण ३६ जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत.
आज सकाळी चंद्रपूर येथे आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन व मुस्लिम अल्पसंख्यांक समुदायाच्या विविध मंडळांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात सुरू असलेली अंमलबजावणी संदर्भात त्यांनी विभागप्रमुखांची चर्चा केली. या चर्चेमध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, याबाबतची सूचना केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुस्लीम, जैन, शीख, बौद्ध, खिश्चन आदी अल्पसंख्याक समुदायासाठी आयोगाने गेल्या काही महिन्यात केलेल्या कामाची माहिती दिली.
सोमवारी दुपारी २.३० वाजता झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी महिला व बालकल्याण विभाग, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तंत्रशिक्षण विभाग, नरेगा, नागरी उपजीविका अभियान, कौशल्य विकास विभाग, मुद्रा बँकमधील अल्पसंख्यांकांचा सहभाग, प्रधानमंत्री आवास योजना अल्पसंख्यांकबहुल वस्तीमधील सुधारणा, सामाजिक सभागृहाचे बांधकाम आदींसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस.एन. झा, मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक नफिस शेख, कौशल्य विकास विभागाचे भैय्यासाहेब येरमे, राजुराच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी भाग्यश्री वाघमारे, उपशिक्षणाधिकारी मनोज गौरकर आदींशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.
यावेळी जिल्ह्यातील काही महत्वाचे प्रकल्प मंत्रालयात प्रलंबित असल्याचे अधिकाºयांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. सर्व प्रकल्पांचा पाठपुरावा केला जाईल व तातडीने जिल्ह्यामध्ये हे सर्व प्रकल्प सुरू होतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर आदी उपस्थित होते.

हे प्रश्न सोडवू
चंद्रपूर जिल्हयातील खिश्चन समुदायाच्या स्मशानभूमीचा प्रश्न निकाली काढण्यात येईल, मुस्लीम दफणभूमीच्या संरक्षण भिंतीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. मौलाना आझाद अल्पसंख्यक महामंडळाच्या कामाला गती दिली जाईल. गडचांदूर व जिवती येथील शादीखाना बांधकाम, चंद्रपूर येथील मटन मार्केट, ताडोबा ते गुरुव्दारा रस्ता, महाकाली कब्रस्तान, अल्पसंख्याक मुलांना शिष्यवृत्तीसाठी झिरो बॅलन्स सुविधा, अल्पसंख्याक समुदायातील तरुणांचे कौशल्य प्रशिक्षण, उद्योग व व्यवसायातील संख्यात्मक वृध्दी, आयटीआयमध्ये जागांची उपलब्धता आदी प्रश्नांना सोडवण्याचे निर्देश व आश्वासन हाजी अराफत शेख यांनी दिले.

Web Title: Resolve the question of minority communities in priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.