शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:43+5:30

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्याचे निर्देश आमदार ना. गो. गाणार यांनी शिक्षण विभागाला दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हा शाखा चंद्रपूरची सहविचार सभा जिल्हा परिषदेमध्ये पार पडली. यावेळी ते बोलत होते.

Resolve teacher questions immediately | शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवा

शिक्षकांचे प्रश्न तात्काळ सोडवा

Next
ठळक मुद्देना.गो.गाणार : जिल्हा परिषदेमध्ये पार पडली सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्याचे निर्देश आमदार ना. गो. गाणार यांनी शिक्षण विभागाला दिले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक जिल्हा शाखा चंद्रपूरची सहविचार सभा जिल्हा परिषदेमध्ये पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला प्रशासन अधिकारी विशाल देशमुख यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पदविधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ तत्काळ द्यावा, आदिवासी क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी द्यावी, डीसीपीएस मधून वगळलेल्या प्राथमिक शिक्षकांची रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये वळती करावी, केंद्र स्तरावर दर महिन्याला होणाऱ्या शिक्षण परिषदेबाबत निर्णय घ्यावा, बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता.
यावेळी राज्य महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, नागपूर विभाग अध्यक्ष के. के.बाजपेयी, जिल्हाध्यक्ष् मधुकर मुप्पिडवार, जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर, दिलीप मॅकलवार, जिल्हाध्यक्ष प्राथमिक विलास बोबडे, संजय लांडे, अमोल देठे, सुंदर धांडे, किरण लांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Resolve teacher questions immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.