मनपात शिक्षक दिनी आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:32 AM2021-09-06T04:32:49+5:302021-09-06T04:32:49+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श ...

Respect ceremony for ideal teachers and meritorious students on Manpat Teachers' Day | मनपात शिक्षक दिनी आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

मनपात शिक्षक दिनी आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

Next

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल, डायटचे प्राचार्य धनंजय चाफले, सभापती छबूताई वैरागडे, सभापती खुशबू चौधरी, नगरसेवक स्नेहल रामटेके, नगरसेविका वंदना तिखे, नगरसेविका आशा आबोजवार, नगरसेविका सविता कांबळे, नगरसेविका अनुराधा हजारे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, उपक्रमशील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शालांत परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणारे शिक्षक शिवलाल इरपाते, एनएमएमएस परीक्षेत उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक भास्कर गेडाम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

डायटचे प्राचार्य धनंजय चाफले म्हणाले, शिक्षण ही कुणाची मालमत्ता नाही. ती श्रीमंतांच्या महालात आणि झोपडीत देखील असते. ती फक्त शोधता आली पाहिजे. यावेळी त्यांनी आदर्श शिक्षण कसा घडावा, याचे उदाहरण सांगितले. प्रास्ताविक प्रशासन अधिकारी नागेश नीत यांनी, कार्यक्रमाचे संचालन स्वाती बेतावार यांनी तर आभार सुनील आत्राम यांनी मानले.

सेवानिवृत्त सत्कारमूर्ती

अनिता दहीवाडे, नसीम अख्तर, उषा पांडुरंग चन्ने, सुरेश बावणे, नीलिमा नंदकिशोर हिंगे, मोहम्मद फजले म. वहीद खान, दीपा प्रदीप पाटील, मीनाक्षी रमेश ठोंबरे, सुरेखा रमेश निंबाळकर यांचा समावेश आहे.

गुणवंत आदर्श शिक्षक

परिणय बंडूजी वासेकर (शहीद भगतसिंग प्रा. शाळा, भिवापूर वॉर्ड) व संजना संजय पिंपळशेंडे (लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, समाधी वॉर्ड).

गुणवंत विद्यार्थी

एकता गिरीश धामनकर, धनश्री सचिन बांगडे, अनुष्का योगेश रागीट, सुधीर केशव गांगले, वैष्णवी विजय सिडाम, वैष्णवी शेखर निधेकर, कल्याणी प्रभाकर इर्ला, अभिनयाकुमार आयनुरी, त्रिशा राकेश दुर्योधन, हिमांशु अशोक ठाकरे.

Web Title: Respect ceremony for ideal teachers and meritorious students on Manpat Teachers' Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.