चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:26 AM2021-09-13T04:26:16+5:302021-09-13T04:26:16+5:30
चंद्रपूर : समाजात शिक्षकांना आदरपूर्वक सन्मान दिला जातो. आईनंतर मुलांचे खरे गुरू शिक्षकच असतात. शिक्षकांच्या संस्कारांमुळे अनेक जण घडतात. ...
चंद्रपूर : समाजात शिक्षकांना आदरपूर्वक सन्मान दिला जातो. आईनंतर मुलांचे खरे गुरू शिक्षकच असतात. शिक्षकांच्या संस्कारांमुळे अनेक जण घडतात. देशाचे भावी नागरिक घडविण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे मत माजी उपशिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सीबीएसएसचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी डाॅ. गोपाल मुंधडा, प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षणाधिकारी मोहम्मद जिलानी उपस्थित होते. भारती हाॅस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये महेंद्र राळे, डाॅ. श्याम धोपटे, क्रांती दहीवडे, वनश्री मेश्राम, डाॅ. भावना टेकाम, तृप्ती चिद्रावरा यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डाॅ. गोपाल मुंधडा यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन कपीश उजगावकर, आभार शिरीष हलदर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डाॅ. सपन दास, विलास माथनकर, जितेंद्र चोरडिया, डाॅ. शर्मिली पोद्दार, संजीवनी कुबेर, डाॅली चव्हाण, सुबोध कासुलकर, साजीद कुरेशी, प्रफुल मेश्राम, जयंत निमगडे यांनी परिश्रम घेतले.