क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली
By admin | Published: October 25, 2015 12:55 AM2015-10-25T00:55:46+5:302015-10-25T00:55:46+5:30
शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर राजगोंड शेडमाके यांचा १५७ वा शहीद दिनाचा कार्यक्रम बुधवारी येथील इंदिरानगर परिसरातील गोंडवाना गोटुल येथे पार पडला.
रॅली : समाजबांधवांचा सहभाग
चंद्रपूर : शहीद वीर बाबुराव पुल्लेसुर राजगोंड शेडमाके यांचा १५७ वा शहीद दिनाचा कार्यक्रम बुधवारी येथील इंदिरानगर परिसरातील गोंडवाना गोटुल येथे पार पडला.
गोंडवाना गोटुल येथून सकाळी १०.३० वाजता शहीदवीरास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार व मोटारसायकल मिरवणूक काढण्यात आली. शहीदभूमी कारागृह परिसरात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मिरवणूक गोटुल परिसरात आली. वीर शहीदास गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोंडराजे वासुदेवशहा टेकाम यांनी वीरचक्र अर्पण करून सर्व गोंडीयन समाजाच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. गोंडराजे वासुदेवशहा टेकाम यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रावण इनवाते, डॉ. रामदास आत्राम, डॉ. निरंजन मसराम, दिलीप मडावी, व्ही.डी. कोकोडे, कांचन वरठी, सुधाकर आत्राम, प्रा. सुमित्रा टेकाम उपस्थित होते.
प्रास्ताविक सुरेश तलांडे यांनी केले. संचालन विजय तोडासे, रमेश कुंभरे, ज्योतीराम गावंडे यांनी केले. आभार धीरज शेडमाके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणिक परचाके, रूषी कोटनाके, डॉ. आनंद किन्नाके, मुक्तेश्वर मसराम, हरिहर शेडमाके, रामभाऊ मडावी, अशोक कुळमेथे, गोवर्धन उईके, माणिक सोयाम, महादेव आत्राम, सुनील सुरपाम, चंद्रभान कुळमेथे, डॉ. गोपाळराव मसराम, शालिक उईके, अरविंद मडावी आदींनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)