वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी -अंजली घोटेकर
By admin | Published: June 8, 2017 12:40 AM2017-06-08T00:40:28+5:302017-06-08T00:40:28+5:30
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविकास महामंडळ चंद्रपूरतर्फे रामबाग वनवसाहतीच्या प्रादेशिक कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण दिन : रामबाग वसाहतीत वृक्षारोपण व विविध कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविकास महामंडळ चंद्रपूरतर्फे रामबाग वनवसाहतीच्या प्रादेशिक कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकानी यासाठी समोर यावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाव्यवस्थापक एस.एस.डोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जी.पी.गरड, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.एस.शेळके, महाव्यवस्थापक एम.सी.गणात्रा, एफडीसीएम लिमीटेड पश्चिम चांदाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच चंद्रपूर परिक्षेत्रातील फायर वॉचर उपस्थित होते.
मुख्य वनसंरक्षक शेळके यांनी आपल्या भारतात वनांचे प्रमाण जवळपास २० टक्के आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ३३ टक्के वन अस्तित्वात असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मागील गतवर्षी महाराष्ट्रात शासनाने २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवलेले होते. त्यानुसार वनविभाग, वनविकास महामंडळ तसेच सामजिक वनीकरण व इतर शासकीय निमशासकीय संस्था इत्यादीनी मेहनत घेऊन २ कोटी पेक्षा अधिक वृक्ष लागवड केल्याचे सांगितले. यावर्षी सुध्दा शासनाने ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हाती घेतलेले आहे. त्यात सवार्नी सहभागी होऊन उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.गवर्षी कार्यालय प्रांगणात लागवड केलेल्या वृक्षाचे संगोपन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.