क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:02+5:302021-03-04T04:52:02+5:30

चंद्रपूर : क्रांतिवीर बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची अवहेलना समाज कधीही खपवून घेणार नाही, असा ...

Restore the statue of the revolutionary Birsa Munda | क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत स्थापन करा

क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा पूर्ववत स्थापन करा

Next

चंद्रपूर : क्रांतिवीर बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत आहे. त्यांच्या पुतळ्याची अवहेलना समाज कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांचा पुतळा सन्मानाने पूर्ववत स्थापन करावा, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आदिवासी महिला आघाडीच्या शहर संघटिका वैशाली मेश्राम, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, कृष्णा मसराम, नरेंद्र गेडाम, राम जंगम, राजेंद्र धुर्वे नितेश बोरकुटे, नागो मेश्राम, महेंद्र शेडमाके, विनोद तोडराम, शुभम मडावी, मनोहर मेश्राम, अनू चांदेकर, सोनू चांदेकर, लता पोरेते, विनोद अनंतवार, राहूल मोहूर्ले, वैशाली रामटेके आदिंची उपस्थिती होती.

बाॅक्स

आदिवासी अस्मितेचे प्रतीक

विश्वविख्यात उलगुलान जन आंदोलनाचे प्रणेते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा जनतेच्या उस्फूर्त समर्थनाने चंद्रपूर रेल्वे स्थानकासमोरील बिरसा मुंडा चौक येथे २१ फेब्रुवारीला बसविण्यात आला होता. परंतु चंद्रपूर शहर महानगर पालिकेने सूचना न देता हा पुतळा २७ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास हटविला. हा निंदनीय प्रकार असून प्रशासनाच्या या जनविरोधी कृत्यामुळे सर्वत्र असंतोष पसरला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Restore the statue of the revolutionary Birsa Munda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.