बोगस बियाणे, खत व कीटकनाशके विक्रेत्यांवर आळा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:14+5:302021-05-11T04:29:14+5:30

संचारबंदीचा फायदा घेत बोगस सोयाबीन आणि कापूस बियाणांची गतवर्षी विक्री करण्यात आली. त्यामुळे सोयाबीन उगवलेच नाही तर कापूस पिकांवर ...

Restrict bogus seed, fertilizer and pesticide sellers | बोगस बियाणे, खत व कीटकनाशके विक्रेत्यांवर आळा घाला

बोगस बियाणे, खत व कीटकनाशके विक्रेत्यांवर आळा घाला

Next

संचारबंदीचा फायदा घेत बोगस सोयाबीन आणि कापूस बियाणांची गतवर्षी विक्री करण्यात आली. त्यामुळे सोयाबीन उगवलेच नाही तर कापूस पिकांवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. तसेच बियाणांचा तुटवडा असल्याचे कारण देत जास्त दरात बियाणे विकण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तसाच प्रकार यावर्षी सुद्धा होऊ नये, यासाठी चंद्रपूर जिल्ह्याला तेलंगणाची सीमा लागलेली असल्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे महाराष्ट्रात येतात त्यांच्यावर आळा घालण्यात यावा. तरच बोगस बी बियाणांवर अंकुश बसेल. कीटकनाशकांची किंमत निश्चित करून शेतकऱ्यांना वाजवी दारात उपलब्ध करून देण्यात यावे.

संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष चंद्रपूर जिल्ह्यात विशेष पथक स्थापन करून धडक मोहीम राबवून कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप कुटेमाटे, संस्थापक अनुप कुटेमाटे यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासह मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

Web Title: Restrict bogus seed, fertilizer and pesticide sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.