अमली पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:39 PM2018-06-27T22:39:58+5:302018-06-27T22:40:13+5:30
चंद्रपूर महानगर व जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होत आहे. याला त्वरीत आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कमल स्पोेर्टींग क्लबने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगर व जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होत आहे. याला त्वरीत आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कमल स्पोेर्टींग क्लबने अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यातील काही व्यक्तींनी अफु, गांजा, चरस यासारख्या अमली पदार्थांची चोरट्या मार्गाने विक्री करून युवावर्गाला व्यसनांच्या विळख्यात गोवण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेऊन टोळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजपूत यांच्याकडे केली.
कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा टोळ्यांचा लवकरच बंदोबस्त करू, असे आश्वासन अतिरिक्त पोलीस अधिक्षकांनी शिष्टमंडळला दिले. यावेळी राहुल गायकवाड, अभिनव लिंगोजवार, शिवम त्रिवेदी, महेश अहीर, प्रणय डंभारे, मयंक अडपेवार, सिनू मालीर्वार, अनुज सोनी, कार्तिक दार्वेकर, रूतूजा नागापुरे, मानवी आक्केवार तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.